________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४२३
६) तमवाचकांना सप्तमीची अपेक्षा असते.
१) गंधेसु वा चंदणमाहु सेटुंढ। (सूय १.६.१९) सुगंधी पदार्थांत चंदनाला श्रेष्ठ म्हणतात. २) नागेसु वा धरणिंदमाहु सेटुं। (सूय १.६.२०) नागांत धरणिंदाला श्रेष्ठ म्हणतात.
७) कोशांत ‘या अर्थी' या अर्थाने सप्तमीचा उपयोग केला जातो.
१) मोरे अल्लल्लो कुक्कुडे अलंपो। (देनामा. १३) अल्लल्ल म्हणजे मोर, अलंप म्हणजे कोंबडा २) हालम्मि कुंतलो । (देनामा ३६) कुंतर म्हणजे हाल (सात वाहन)
८) कधी तुमन्तार्थी हेतु दर्शविण्यास सप्तमीचा उपयोग केला जातो.
१) चिटुंति तत्थ पंच वि जोएंता मारणे छिदं। (अगड ३०५) मारण्यास दोष (छिद्र) पहात पांचहि (जण) तेथेच राहिले २) रक्खणपोसणे मणुस्सो सि। (सूय १.४.१.१४) रक्षण-पोषण करण्यास (तूच एक) माणूस आहेस.
९) 'अलं' या अव्ययाला कधी सप्तमीची अपेक्षा असते. नाल दुक्खाउ मोयणे (उत्र ६.६) दुःखातून सोडविण्यास असमर्थ ।
१०) खालील अर्थाचे धातु (व नामे) यांना सप्तमीची अपेक्षा असते.
१) रमणे : १) न मे इमंमि रमइ मणं। (नल पृ. ३) माझे मन याचे ठायी रमत नाही. २) रमसु धम्ममि। (सुपास ५१८) धर्मांत रत हो
२) आसक्त असणे : (ज्यांत आसक्त त्याची सप्त) : १) रूवे मुच्छिए। (नायांस पृ. १८५:) रूपांत आसक्त २) नरीसु नोवगिज्झेजा। (उत्त. ८.१९) हिंसेत का आसक्त होतोस? ४) उत्तिमपुरिसा... धम्मकहाए चेव अणुजंति। (समरा पृ. ४) उत्तम पुरूष फक्त धर्मकथेत आसक्त होतात. ५) अजुत्तो भवे पडिबंधो। (पाकमा पृ. ७४) संसारात आसक्ती अयोग्य आहे.
__३) साहचर्य, स्थिती : १) सुपुरिसमग्गम्मि ठिओ पुरिसो पावेइ कल्लाणं। (नाण १०.७३) सत्पुरूषांच्या मार्गावर राहिलेला पुरूष कल्याण प्राप्त करून घेतो. २) जोव्वणे वट्टमाणा । (ओव पृ. ३०) तारूण्यात असणारे ३)
१) प्रायः षष्ठीची अपेक्षा आढळते. २) ज्यांत रमायचे त्याची सप्तमी