________________
४२२
अर्धमागधी व्याकरण
सप्तमीत ठेवले जातात.
अ) स्थळ : १) न सरीरम्मि एयम्मि सुइत्तं किं पि विजए। (बंभ पृ. ३७) या शरीरांत काहीही शुचित्व नाही. २) सीहासणे निसीयइ। (महा पृ. १३८अ) सिंहासनावर बसतो ३) तुह धम्मे केत्तियाई तत्ताइ। (जिन पृ. ३०) तुझ्या धर्मामध्ये किती तत्त्वे आहेत ?
आ) काळ : १) आसाढे मासे (उत्त. पृ. २६.१३) आषाढ महिन्यात २) न लहइ सुक्खं दिणे निसाए वा। (नल पृ. ४१) दिवसा वा रात्री सुख मिळाले नाही.
२) ज्या मुख्य वा गौण स्थानावर क्रिया घडते त्याची सप्तमी असते.
१) तं तं सिरम्मि निवडइ। (वजा १२०) ते ते डोकीवर पडते. २) भोगी भमइ संसारे । (उत्त २५.४१) भोगी संसारात भ्रमण करतो ३) दुत्तरदुक्खसमुद्दे निवडइ सो। (अगड १४३) दुस्तर दुःखरूपी समुद्रात तो पडला.
३) जे पकडले जाते त्याची सप्तमी असते.
१) रोसेण कंठे घेत्त्ण निद्धाडिओ दूओ अवद्दारेणं । (महा पृ. ११ ब) रागाने गळा पकडून दूताला अपद्वाराने हांकलले २) पित्तूणं केसेसुं भणियं अयलेप। (धर्मो पृ. १०३) केस पकडून अयलाने म्हटले.
४) गत्यर्थक धातूंच्या गंतव्याची कधी कधी सप्तमी वापरतात.
१) जंति नरएसु। (कथा पृ. ९) नरकात जातात. २) गओ गिरिसिहरे। (पाकमा. पृ. ६७) पर्वत शिखरावर गेला. ३) नेसु उयहिंमि गंग। (पाकमा पृ. २७) गंगेला समुद्राकडे ने.
५) अनेकांतून एक वा काही दर्शविताना सप्तमीचा उपयोग करतात.
सं एसु जायए सूरो सहस्सेसु य पंडिओ। (वसु १०५.८) शंभरात (एखादा) शूर, हजारात (एखादा) पंडित असतो. १) गंतव्याची प्रायः द्वितीया असते. २) म. गावी गेला, घरी पोचला इत्यादी ३) प्रायः षष्ठीचा उपयोग असतो. ४) घाटगे पृ. १७९