________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४२१
आ) सत्षष्ठीत कधी धातुसाधिता बरोबर एवं (तहा, इत्थं) इइ (इति) यांचा उपयोग केला जातो.
१) इय तस्स भणंतस्स वि खणेण खयरो अइंसणं पत्तो। (नल पृ. ४७) तो असे म्हणत असताना सुद्धा क्षणात खेचर अदृश्य झाला. २) एवं जंपंताणं नयणपहं वज्जिऊण दिवसयरो अहंसणमावन्नो । (अगड १०९) ते असे बोलत असताना त्यांचा दृष्टीपथ टाळून सूर्य अदृश्य झाला. (अस्तास गेला)
इ) एव, मेत्त (मात्र) यांचा धातुसाधिता बरोबर उपयोग असता काही तोच तत्काळ असा अर्थ होतो.
तुह नीहरियमेत्तस्स गामंतराउ अहमागया। (धर्मो पृ. ६९) तू बाहेर पडला नाहीस तोच मी गावाहून आले.
१३) पुष्कळदा इतर विभक्तीऐवजी षष्ठीचा उपयोग केला जातो.
अ) द्वितीयेऐवजी : सीमंधरस्स वंदे। (हेम ३.१३४) सीमंधराला वंदन करतो.
आ) तृतीयेऐवजी : १) तेसिं एयं अणाइण्णं निग्गंथाण महेसिणं। (दस ३.१) त्या निग्रंथ महर्षीकडून अनाचरणीय २) तस्स साहूणं दिन्नो जहोवएसो। (पउम ३३.२९) साधूंनी त्याला योग्य उपदेश केला.
इ) पंचमीऐवजी : १) विरत्तो भवदुहस्स। (सुपास ६४०) संसारदुःखातून विरक्त २) न विरमए कुसुमोच्चयस्स। (समरा पृ. ३४९) फुले गोळा करण्याचे थांबविले नाही. ३) इह पर लोग सुहाण चुक्कइ। (धर्मो पृ. ७२) इहपरलोक सुखाला मुकतो
ई) सप्तमीऐवजी : १) सा य मूलदेवस्स रत्ता। (कथा पृ. ७२) आणि ती मूलदेवाचे ठायी आसक्त होती २) संखाणं सिंगाणं। (राय पृ. ९६)
४१२ सप्तमी विभक्तीचे उपयोग
१) आत, वर, मध्ये या अर्थी मुख्य वा गौण स्थलकालवाचक शब्द
१) क्वचिद् द्वितीयादेः। हेम ३.१३४ २) षष्ठी सप्तम्यर्थे। राय. (मलय.) पृ. १०९