________________
४२०
अर्धमागधी व्याकरण
२) पच्चक्खं : सव्वजणस्स पच्चक्खं। (नल पृ. ४१) सर्व जनांच्या
देखत
३) परोक्खे : मम परोक्खे। (बंभ पृ. ५५) माझ्या परोक्ष
४) अलं : १) अलं अप्पणो होइ अलं परेसिं। (दस ८.६२) स्वतःचे व दुसऱ्यांचे रक्षण करण्यास समर्थ होतो. २) अलं पासायखंभाण। (दस ७.२७) प्रासाद स्तंभासाठी पुरेसे.
५) हद्धी : हद्धी तह मज्झ भागधिजाण। (सुपास ६०३) तसेच माझ्या नशिबाचा धिक्कार असो।
६) धिरत्थु : १) धिरत्थु विज्जुरेहव्व चंचलाणं रिद्धीणं। (चउ पृ. २६) वीजेच्या चमकीप्रमाणे चंचल असणाऱ्या रिध्दींचा धिक्कार असो।
२) धिरत्थु ते जसोकामी। (दस २.७) हे यशाची इच्छा करणाऱ्या, तुझा धिक्कार असो। ३) धिरत्थु भोगाणं। (कथा पृ. १००) भोगांचा धिक्कार असो।
७) नमो : नमो अरिहंताण नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं। अरहंतांना, सिद्धांना, आचार्यांना, उपाध्यायांना व जगांतील सर्व साधूंना नमस्कार असो।
नमोत्थु : नमोत्थुणं समणस्स भगवओ महावीरस्स। (ओव पृ. १४) श्रमण भगवान महावीराला नमस्कार असो ।
८) कए : मह कए उवट्ठिओ एसो पलओ। (नल पृ. ५) माझ्यासाठी (द मुळे) हा प्रलय निर्माण झाला.
१२) सत्षष्ठीचा उपयोग सहचारी क्रिया दर्शविण्यास होतो.
१) परहत्थं संपत्ता ताव पिया मज्झ नियंतस्स। (सुर ४.२२६) मी पहात असतानाच प्रिया आत्ता दुसऱ्याच्या हाती गेली २) एवं विचिंतयंतस्स तस्स हत्थी अदंसणी भूओ। (सुर १०.१२०) तो असा विचार करीत असतानाच, हत्ती अदृश्य झाला.
अ) कधी सत्षष्ठीने अनादर दर्शविला जातो.
सो ताण रूमंतीणं नीओ सीहोयरो गुरूसमीवं । (पउम ३३.१२२) त्या रडत असतांही, तो सीहोयर (त्याने आपल्या) मोठ्या (भावा) जवळ नेला. १) सत्षष्ठी-रचनेच्या माहितीसाठी पुढे सति सप्तमी पहा.