________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४१९
ऋषींत वर्धमान श्रेष्ठ २) दाणाण सेढें अभयप्पयाणं। (सूय १.६.२३) दानांत अभयदान श्रेष्ठ ३) तेसिं जेट्ठो जण्हुकुमारो। (पाकमा पृ. १७) त्यांच्यात जण्हकुमार हा ज्येष्ठ ४) तिलुत्तमा उत्रमा सुरवहूणं। (धूर्ता १.६५) देवस्त्रियांत तिलोत्तमा उत्तम
आ) श्रेष्ठत्ववाचके : १) सीहे मियाण पवरे। (उत्त. ११.२०) पशूत सिंह श्रेष्ठ २) पहाणो हं सेसराईणं। (धर्मो. पृ. ७४) बाकीच्या राजांत मी प्रधान आहे. अणायदुक्खा सुहीण ते पढमा। (लीला ५७१) ज्यांना दुःखच ठाऊक नाही ते सुखीलोकांत श्रेष्ठ.
९) क. भू. धा. वि.१ चा उपयोग नामाप्रमाणे असता. त्याला षष्ठीची अपेक्षा असते.
१) तं पुव्वजम्मपावस्स विलसियं। (सुपास ५१०) ते पूर्वजन्मीच्या पापाचे विलासित २) सोऊण जिणिंदस्स भासियं। (महा पृ. २५९ अ) जिनेंद्राचे भाषण ऐकून
१०) 'ओ' प्रत्ययान्त अव्यये, स्थलदर्शक अव्यये इत्यादींना षष्ठीची अपेक्षा असते.
अ) १) तस्स पुरओ। (बंभ पृ. ४८) त्याच्या पुढे
आ) १) वडपायवस्स हेट्ठा। (बंभ पृ. २६) वटवृक्षाखाली २) तुम्ह उवरि। बंभ पृ. २६) तुमच्यावर ३) नयरीए बहिया। (अंत६) नगरीच्या बाहेर
इ) १) ताण समीवं। (बंभ पृ. २८) त्यांच्याजवळ २) मम सयासे। (अरी १०) माझ्याजवळ ३) रन्नो आसन्ने। (नल पृ. २९) राजाच्या जवळ
११) समक्खं, पच्चक्खं, परोक्खे या शब्दांना व अलं, हद्धी धिरत्थु, नमो (नमोत्थु) कए या अव्ययांना षष्ठीची अपेक्षा असते.
१) समक्खं : मम समक्खमेव । (समरा पृ. ३८) माझ्या समक्षच
१) क. भू. धा. वि. चा. उपयोग वर्तमानार्थी असता त्यालाही षष्ठीची अपेक्षा
असते. (काळे पृ. ५०१) उदा. संमओ पयइलोयस्स। (महा. पृ. २८ ब) प्रजाजनांना संमत संमओ सामंतामच्चाणं। (कथा पृ. १२) सामंत, अमात्य यांना संमत