________________
४१८
अर्धमागधी व्याकरण
९) कुशल : संपयं कुसलं सव्वेसिं। (नल २४) आता सर्वांचे कुशल आहे.
१०) वत्सल : दीणाणाहाण वच्छलो। (धर्मो पृ. ३:) दीन व अनाथ यांशी वत्सल
११) उपकारी : उवयारी तुमं अम्हाणं। (धर्मों पृ. ६८) तू आमचा उपकारी आहेस.
१२) उत्कंठित : उक्कंठिय म्हि दढं जणयजणणीणं। (जिन पृ. १२) मला आईबापांची फार उत्कंठा लागली आहे.
१३) टाळणारा : १) गुणाणं च विवजओ। (दस ५.२.४९) गुण टाळणारा २) अगुणाणं विवज्जओ। (दस ५.२.४४) अगुण टाळणारा.
१४) संति य (स्वामित्वदर्शक) : १) मह संतिए म्साणमि। (जिन पृ. २०) माझ्या मालकीच्या श्मशानात २) तुह संति यमेव सव्वमेयं (जिन पृ.२४) हे सर्व तुझेच आहे.
६) काल दर्शविताना षष्ठीचा उपयोग केला जातो.
१) सा सत्तरत्तस्स कालगया। (वसु ९०.१२) ती सात दिवसांपूर्वी मेली. २) राया पंचमदिणस्स तम्मि नगे वच्चइ। (चउ पृ. ४६) राजा पाचव्या दिवशी त्या पर्वतावर जाई. ३) चिरस्स विउद्धा (कथा पृ. ४८) बऱ्याच वेळाने जागी झाली ४) चिरकालस्स पत्ताओ। (धर्मो पृ. १९९) बऱ्याच वेळाने आल्या.
७) अनेकांतून एक वा काही दर्शविणे असता. अनेकांची षष्ठी वापरली जाते.
१) जो अम्हं समणो वा समणी वा। (नायास पृ. ६७) आपल्यातील जो श्रमण वा श्रमणी २) जह पव्वयाण मेरू नईण गंगा मियाण पंचमुहो। पक्खीण जहा गरूडो सेसाही सयलभुयगाण।। (महा पृ. १७४ अ) ज्याप्रमाणे पर्वतांत मेरू, नद्यांत गंगा, पशृंत सिंह, पक्ष्यांत गरूड, सर्व सर्वांत शेष सर्प
८) तमवाचके व श्रेष्ठत्व वाचकें यांना षष्ठीची अपेक्षा असते.
अ) तमवाचके : १) इसीण सेढे तह वद्धमाणे। (सूय १.६.२२) तद्वत १) घाटगे पृ. १९७ २) घाटगे पृ. १७८