________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४१७
१) तुल्य, सदृश : १) सरिसे णं तुमं तस्स अगडदडुरस्स (नायांस पृ. १८५) तू त्या कूपमंडूकासारखा आहेस. २) इंदगइंदस्स सारिच्छो। (अगड पृ. ५७) इंद्राच्या ऐरावतासारखा ३) नत्थि मम समो पावो। (महा पृ. ११५ ब) माझ्यासारखा पापी नाही.
२) प्रिय, अप्रिय, इष्ट अनिष्ट, वल्लभ : १) कुमरो सव्वेसिं वल्लहो जाओ । (कुम्मा १२४) राजपुत्र सर्वांना प्रिय झाला २) केसिं च पियं गजं । (जिन पृ. १) काहीना गद्य आवडते. ३) निच्चं पि अहं जिणरस्खियस्स इट्ठा। (नाया९) मी नेहमीच जिणरक्खियाला प्रिय होते. ४) निच्चं पि अहं जिणपालियस्स अणिट्ठा। (नायासं पृ. १२९) मी नेहमीच जिण पालियाला अप्रिय होते. ५) अवच्चरूवाणि कस्स वि न अप्पियाणि होति। (अरी. पृ. ८) मुले कुणालाही अप्रिय असत नाहीत.
३) मीलन १) तुमं मज्झ मिलिओ सि। (कुम्मा ३१) तुझे माझ्याशी मीलन झाले आहे. २) हवंति अवरस्स संजुत्ता। (पउम ५.१) दुसऱ्याशी संयुक्त होतात.
४) भेद, अंतर, फरक : १) सावगाणं साहूणं किं अंतरं। श्रावक साधू यांतील भेद कोणता? २) को विसेसो तुम्हा णमेमाण य? (कथा पृ. ११५) तुमच्यात आणि यांच्यात फरक काय ?
५) योग्य, अनुरूप, प्रशस्त, उचित : १) तुह जोग्गा। (वजा. २२४) तुला योग्य २) विवित्तवासो मुणिणं पसत्थो। (उत्त. ३२.१६) एकांतवास मुनींना प्रशस्त ३) मज्झ अणुरूवं। (सिरि. १३९) मला अनुरूप ४) ममावि एवं चेव उचियं। (जिन पृ. ५५) मला सुद्धा असेच उचित आहे.
६) सुटका : कडाण कम्माण न मोक्खु अत्थि। (उत्त. ४.३) केलेल्या कर्मांतून सुटका नाही.
७) भीति : १) नत्थि मे मच्चुभयं। (नल पृ. १७) मला मृत्युभय नाही. २) पभीओ पर लोगस्स। (उत्र ५.११) परलोकाला फार भ्यालेला ३) नो भेयव्वं कस्स वि। (सुपास. ५८४) कुणालाही भिऊ नये.
८) स्वागत : सागयं ते। (समरा पृ. १४) तुझे स्वागत असो ।
१) शार्पे, पृ. २९९