________________
४१६
अर्धमागधी व्याकरण
३१) भीमाने दहिवन्नाकडे दूत पाठविला.
१८) सुटणे १ : (ज्यातून सुटका त्याची षष्ठी): १) मुच्चंति दुक्खाणं। पउम ३३.५५) दुःखातून सुटतात. २) सव्वदुक्खाण मुच्चई। (उत्त ६.८) सर्व दुःखातून मुक्त होतो.
१९) प्रभावी असणे : (ज्याचेवर प्रभाव त्याची षष्ठी) : १) कस्स उण एसो न पहवइ। (समरा पृ. ७२४) कुणावर बरे हा प्रभावी ठरत नाही? २) न वि तस्स किंचि पहवइ। (सुपास ५९२) त्याच्यावर कशाचाही प्रभाव चालत नाही.
२०) ऋणी असणे : तुज्झ पिया मम पिउणो धारेइ अणूणगं सयसहस्सं। (धर्मो. २०७) तुझा बाप माझ्या बापाचे बरोबर एक लाख देणे लागतो.
२१) विश्वास ठेवणे : (ज्याचेवर विश्वास त्याची षष्ठी) : १) जइ पत्तियह न मज्झं। (सुपास. ५९४) जर माझ्यावर विश्वास नसेल. २) अओ न इत्थीण वीससियव्वं। (धर्मो. पृ. १४७) म्हणून स्त्रियांवर विश्वास ठेवू नये. ३) नियकलत्तस्स वि न वीससियव्वं। (कथा पृ. १७६) आपल्या बायकोवर सुध्दा विश्वास ठेवू नये.
२२) संतुष्ट होणे : (ज्वार संतुष्ट, त्याची षष्ठी) : तुह तुट्ठाह। (नल पृ. ४९) तुझ्यावर मी संतुष्ट झाले आहे.
२३) नमस्कार करणे : (ज्याला नमस्कार त्याची षष्ठी) : १) सिद्धाण नमुक्कारं काऊण। (पउम ३.१३६) सिद्धाना नमस्कार करून २) जो कुणइ नमोक्कारं अरहंताणं। (पउम ३५.३७) जो अरहंतांना नमस्कार करतो.
२४) उपदेश करणे : (ज्याला उपदेश त्याची षष्ठी) :
१) उवइसइ तस्स मंतं। (सुपास ५१२) त्याला मंत्र उपदेशिला २) तेण एगं ते उवइट्टो मम.. मंतो। (महा पृ. ८६ अ) त्याने मला एकान्तात मंत्र उपदेशिला
५) खालील अर्थाच्या व तदर्थक नामांना व विशेषणांना षष्ठीची अपेक्षा असते. १) बहुधा पंचमी लागते. पंचमीचे उपयोग' पहा २) कधी सप्तमी लागते. सप्तमीचे उपयोग पहा. ३) वंद, नमसं इत्यादी क्रियापदांना द्वितीया लागते. उदा. १) समणं भगवं
तिक्खुत्तो आयाहिणपयाहिणं करेइ वंदइ नमसइ। (नायासं पृ. २४) २) नमसइ अउज्झनयरीजिणहराई। (नल पृ. ३५)