________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४१५
१०) उपकार करणे : (ज्याच्यावर उपकार त्याची षष्ठी) : १) किं एएसिं उवयरामि। जिन पृ. १०) मी यांच्यावर काय उपकार करूं? २) निरूवयारिणो वि उवयारो कायव्वो उवयारिणो पुण विसेसेण। (धर्मो ६८) निरूपकाऱ्यावर सुध्दा उपकार करावा. उपकाऱ्यावर प्रामुख्याने (उपकार करावा.)
११) प्रसन्न होणे : (ज्यावर प्रसन्नता त्याची षष्ठी) :
१) जो पुण पुण्णविहूणो तस्स तुमं नो पसीएसि। (सिरि. ९६) जो पुण्यहीन आहे त्याच्यावर तू प्रसन्न होत नाहीस २) पसीय मज्झ। (नल पृ. ९) माझ्यावर प्रसन्न हो. ___ १२) दाखविणे : पृ. (ज्याला दाखवायचे त्याची षष्ठी) : १) मम ताव तं पएसं दंसेहि । (समरा पृ. १५२) मला आता तो प्रदेशा दाखव. २) धम्मपहं दरिसिऊण लोगस्स। (पउम ४.८८) लोकांना धर्म मार्ग दाखवून.
१३) अन्न वाढणे : (ज्याला वाढायचे त्याची षष्ठी) : तस्स घरसामिणी परिवेसइ । (अरी पृ. ७) त्याला गृहस्वामिनीने जेवण्यास वाढले. (२) तस्स परिवेसियं तं । (सुपास. ४९६) त्याला ते वाढले.
(१४) शोभणे : (ज्याला शोभायचे त्याची षष्ठी) नीयकम्ममेयं छज्जइ नीयस्स लोयस्स। (जिन पृ. १०) हे नीच कर्म नीच लोकांनाच शोभते
१५) मिळणे, एकत्र येणे : (ज्याच्याशी मीलन त्याची षष्ठी) :
१) सो मिलिओ : चारूदत्तस्स। (महा पृ. २०१ ब) तो चारूदत्ताला मिळाला. (मीलन झाले) २) तहा काहामि जहा मिलसि नियपिययमस्स। (महा पृ. १०४ ब) असे करीन की ज्यामुळे तुझे तुझ्या प्रियतमाशी मीलन होईल.
१६) अपराध करणे : (ज्याचा अपराध केला असेल त्याची षष्ठी) :
१) एयस्स किमवरद्ध। (महा पृ. १७७ ब) याचा काय अपराध केला होता?
२) जइ वि बाढं अवरद्धं कुमारेही तुम्ह। (महा पृ. ४६ अ) जरी कुमारांनी तुझा पुष्कळ अपराध केला आहे.
१७) पाठविणे : ज्याच्याकडे पाठवायचे त्याची षष्ठी :
१) पेसिओ दीहेण कडगाईण दूओ । (बंभ पृ. ८०) दीहाने कडग इत्यादींच्याकडे दूत पाठविला. २) पेसिओ भीमेण दहिवन्नस्स दूओ। (नल पृ.