________________
४१४
अर्धमागधी व्याकरण
तारिसं। (दस ५.१.२८) तशा प्रकारचे (घेण्याची मला अनुज्ञा नाही. २) तंबोलो न कप्पइ बंभयारीणं। (कथा पृ. ४२) तांबूलाची (खाण्याची) ब्रह्मचाऱ्यांना अनुज्ञा नाही।
५) जाणविणे : (ज्याला जाणवावयाचे, त्याची षष्ठी) : १) एसो रन्नो अन्नेसिंच जाणावेसइ (बंभ पृ. ३२) राजाला आणि इतरांना हा माहीत करून देईल. २) एयस्स रहसि जाणावेहि। (बंभ पृ. ४१) ह्याला एकान्तात कळव.
६) आठवणे' : (ज्याची आठवण व्हायची, त्याची षष्ठी) :
१) कस्स कयंतेण सुमरियं। (महा पृ. ६४ अ) कृतान्ताने कुणाचे स्मरण केले?
२) अज मए बंधवाण सुयरियं। (समरा पृ. ३४४) आज मला बांधवांची आठवण झाली.
७) क्षमा करणे : (ज्याला क्षमा करायची, त्याची षष्ठी):
१) अविणीयस्स मे खमसु। (वसु२अ २५.२५) अविनीत अशा मला क्षमा कर
२) खमसु मज्झ। (महा. पृ. ३१८ ब) मला क्षमा कर.
८) भरणे : (ज्याने भरायचे, त्याची षष्ठी) : १) भरिऊण नीरस्स। (सुपास ६४६) पाण्याने भरून २) पायसघयदहियाणं भरिऊणं भंडए गरूए। (अगड २१९) पायस, घृत दही यांनी मोठी भांडी भरून
९) त्याग करणे : (ज्याचा त्याग, त्याची षष्ठी) : तस्स भंते पडिक्कमामि। (दस४) महाराज, मी त्याचा त्याग करतो. १) पुष्कळदां द्वितीयाही वापरली जाते : सुमरेहि मम पत्थणं। (समरा पृ. ७३२)
माझी प्रार्थना लक्षात ठेव, नाहमप्पणो अवराहं संभरामि। (कथा पृ. २७) मला
स्वतःचा अपराध आठवत नाही. (येथे द्वितीयार्थी षष्ठी असे म्हणता येईल) २) कधी द्वितीया : खमह मम अवराह। (महा पृ. १५४ अ) माझा अपराध क्षमा
करा. २अ) घाटगे पृ. १७८ ३) येथे तृतीयार्थी षष्ठी म्हणता येईल. पहा षष्ठी तृतीयार्थे। (राय, मलय, पृ.
१४८)