________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४१३
१) जीवस्स उ सुहावहं। (उत्त ३१.१) जीवाला सुखावह २) सईण न हि दुक्करं किं पि। (नर्ल पृ. १८७ अ) तू त्रिभुवनाला पूज्य आहेस. ___४) संस्कृतमध्ये चतुर्थी घेणारी क्रियापदे अर्धमागधीत षष्ठी घेतात.
१) देणे, अर्पण करणे : (ज्याला द्यायचे त्याची षष्ठी)
१) मम करं देह । (चउ पृ. १९) मला कर द्या. २) राया नमुइस्स अप्पए रज्ज। (संपइ. २.४९) राजाने नमुईला राज्य अर्पण केले.
२) सांगणे : ज्याला सांगायचे त्याची षष्ठी : १) भयवं कहेह अम्हं । (कुम्मा. ३९) भगवन् आम्हाला सांगा २) बुहजणो अन्नमन्नस्स एवमाइक्खइ। (निरया पृ. १९) पुष्कळ लोकांनी एकमेकांना असे सांगितले.
___३) रागावणे : (ज्यावर रागवयाचे त्याची षष्ठी) : १) न वि ते कुप्पंति एक्कमेक्कस्स । (पउम ३.४०) आणि ते एकमेकांवर रागावत नसत. २) सा वि कुविया बंभदत्रस्स । (समरा पृ. १३६) ती सुद्धा बंभदत्तावर रागावली
४) आवडणे : (ज्याला आवडते त्याची षष्ठी) : १) तुज्झ रुच्चइ किमेसो। (नल पृ. ४) तुला हा आवडला काय? २) जं तुह पिउणो पडिहाइ तं करेज्जासि । (महा. पृ. १९९ ब) जे तुझ्या पित्याला आवडेल ते तू करावेस.
४) खालील अर्थाच्या क्रियापदांना षष्ठीची अपेक्षा असते.
१) ऐकणे' : (ज्याचे ऐकायचे त्याची षष्ठी) : १) सुणेह मे। (उत्त १.१) मी सांगतो ते ऐका २) पंडियाण निसामिया । (आचारांग १.८.३) पंडितांचे ऐकून
२) भिणे : पृ. (ज्याला भ्यायचे त्याची षष्ठी) : १) बीहेमि निय कुलकलंकस्स । (महा पृ. ३६ अ) स्वतःच्या कुळाच्या कलंकाला मी भितो २) नाहं मरणस्स बीहेमि । (समरा पृ. १३०) मी मरणाला भीत नाही.
३) योग्य असणे : (ज्याला योग्य त्याची षष्ठी) : १) नायतत्तस्स तुज्झ नो जुज्जए इमो गव्वो । (सिरि ९५) तत्त्व माहीत असणाऱ्या तुला हा गर्व योग्य नाही.
४) अनुज्ञा असणे : (ज्याला अनुज्ञा, त्याची षष्ठी) : १) न मे कप्पइ १) पुष्कळदां द्वितीया उदा. न सुणंति परममित्ताणं वयणं। (समरा पृ. ६७६) २) बहुधा पंचमी लागते. 'पंचमीचे उपयोग' पहा