________________
४१२
अर्धमागधी व्याकरण
३) आधार -आधेय १) इमं सरीरं .. दुक्खकेसाण भायणं। (उत्र १९.१२) हे शरीर दुःखक्लेशांचे आश्रयस्थान २) नाणाविह सावयाण आवासं। (पडम ३३.५) नानाविध श्वापदांचे वसतिस्थान.
४) अवयव-अवयवी १) वडपायवस्स मूले गंतूण। (अगड १३०) वटवृक्षाच्या मुळाशी जाऊन २) तीए उदरे। (बंभ पृ. ३९) तिच्या उदरात
५) वर्ण्यविषय-वर्णक – पढमस्स अज्झयणस्स अयमढे पन्नत्ते । (विवाग पृ. १२) पहिल्या अध्ययनात हा भाग सांगितला आहे.
६) धर्म-धर्मी, गुण-गुणी : तस्स रूवं तु पासित्ता। (उत्त २०.५) त्यांचे रूप पाहून
७) नाते : मम पत्ती। (बंभ पृ. २७) माझी पत्नी
८) उत्पाद्य-उत्पादक : १) भेरीए सदं सोच्चा। भेदीचा शब्द ऐकून २) तस्स वयणं। (बंभ पृ. ३१) त्याचे वचन
९) भाग : १) अंतो लयणस्स सा ठिया। (उत्त. २२.२३) ती गुहेच्या आंत उभी राहिली २) वाणारसीए बहिया। (उत्र २५.३) वाणारसीच्या बाहेर
१०) कर्तृ-क्रिया : भाउणो आगमणं। (यों पृ. ३०) भावाचे आगमन
११) स्वामित्व - (१) तस्स मेहस्स जो पहू । (उत्त. १९.२२१) त्या घराचा जो प्रभु २) धणस्स मे नासो । (सुपास ५६७) माझ्या धनाचा नाश
१२) इतर सामान्य संबंध : १) मोग्गर पाणिस्स पडिमा (अंत १००) मोग्गरपाणींची प्रतिमा. २) छिन्नो मे संसओ इमो। (उत्त. २३.२८) हा माझा संशय नष्ट झाला. ३) जाया तस्स जीवियासा। (बंभ पृ. ४७) त्याला जगण्याची आशा आली. ४) एयस्स दंसण पि। (जिन पृ. २२) त्याचे दर्शनसुद्धा ५) कम्माणं खएणं । (अंत ५७) कर्मांच्या क्षयाने ६) परलोगस्स आराहगा। (ओव पृ. ६१) परलोकाचे आराधक
२) षष्ठ्यन्त पद कधी विधेय म्हणून येऊ शकते.
किं नत्थि ममं जं अन्तराईणं अत्थि। (चउ पृ. २४) इतर राजा जवळ आहे असे माझ्या जवळ काय नाही?
३) ला (साठी-करिता) या चतुर्थीच्या अर्थी षष्ठीचा उपयोग होतो. १) घाटगे पृ. १९५ २) छट्ठीविभत्तीए भण्णइ चउत्थी। (राय, मलय पृ. २६६ वर उद्धृत)