________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४११
९) भीती, इत्याद्यर्थक शब्द व इतर काही शब्द यांनाही पंचमीची अपेक्षा
असते.
१) भीति : नत्थि तुह ममाहिंतो भयं । ( महा पृ. २३९ ब ) तुला माझ्यापासून भय नाही.
२) रक्षण : धम्मो च्चेवेत्थ सव्ववसणेहिंतो रक्खगो' । (येथे धर्म हाच सर्व संकटातून रक्षण करणारा आहे)
३) सुटका : मोक्खो दुक्खाओ। (नाण पृ. ४.९८) दुःखातून सुटका ४) विडंबन : विडंबणं दुज्जणजणाओ । (समरा पृ. ९) दुर्जनाकडून
उपहास
५) अपमान : अवमाणणं लोगाओ । (समरा पृ. १०) लोकांकडून
अवमान
६) वंचित : वंचिओ म्हि एत्रिय कालं... विसयसुहाओ। धर्मो इतका काळ मी विषय सुखाला आंचवलो
१०) प्रश्नोत्तरात स्थलदर्शक शब्द पंचमीत ठेवतात.
१) भद्द कओ तुमं । तेण भणिय - सुसम्मनयराओ (समरा पृ. २१०) ‘भल्या माणसा, तू कोठून आलास?' त्याने म्हटले सुसम्म नगरांतून २) भो कत्तो तुमं । तेण भणिय - रायगिहाओ । (धर्मो पृ. १५३) अरे, कोठून आलास तू? त्याने म्हटले रायगिह नगरांतून.
पृ. १६१)
४११ षष्ठी विभक्तीचे उपयोग
१) दोन पदार्थातील विविध संबंध दाखविण्यास षष्ठीचा उपयोग होतो. १) कार्य-कारण : १) कम्मं जाईमरणस्स मूलं । (उत्त. ३२.७) कर्म हे जन्ममरणाचे मूळ २) सुवण्णस्स पडिमा । (सोन्याची प्रतिमा)
२) हेतु, प्रयोजन : १) अन्नस्स अट्ठा इहमागओ मि । ( उत्त १२.९) अन्नासाठी मी येथे आलो आहे. २) सामिधेयस्स अट्ठाए । ( अंत ५६ ) समिधासाठी
१) शार्पेटायर, पृ. ३६७