________________
४१०
अर्धमागधी व्याकरण
२) निवृत्ति, विराम : (ज्यापासून निवृत्ति त्याची पंचमी):१) नियत्तसु इमाओ संगामाओ। (चउ. पृ. ४७) या संग्रामांतून निवृत्त हो २) विरम पूयाओ। सुपास ५१०) पूजा थांबव
३) भीति’ :- (ज्याला भ्यायचे त्याची पंचमी) : १) किं बोहसि न पावाओ। (सुपास पृ. ५३२) पापाची भीति वाटत नाही काय? २) मा बीहेसु कालक्खेवाओ । (नल पृ. ३३) कालक्षेत्र (होईल) म्हणून भिऊ नको.
४) उद्वेग : (ज्यापासून उद्वेग त्याची पंचमी) : उव्विगं मे चित्तं संसारवासाओ। (जिन पृ. ७१) संसारवासातून माझे चित्त उद्विग्न झाले आहे.
५) विरक्ती : (ज्यातून विरक्ती त्याची पंचमीः : १) विरत्तं संसारसायराओ चित्तं। (समरा पृ. २८०) संसारसागरांतून चित विरक्त झाले आहे २) बाढं विरत्तं मम रज्जादीहितो चित्तं। (महा पृ. ८७ ब) राज्य वगैरे बद्दल माझे चित्त अगदी विटले आहे.
६) लज्जा : (ज्याला लाजायचे त्याची पंचमी) : १) न लजसे लोआओ। (नल पृ. ५) (तुला) लोकांची लाज वाटत नाही? २) हला दूइए, किं भाउणो वि न लज्जए राया। (धर्मो पृ. २१५) अगे दूती, भावाची सुद्धा राजाला लाज वाटत नाही काय?
७) सुटका' : (ज्यातून सुटका त्याची पंचमी) : १) मुणी .. भवाओ परिमुच्चए। (उत्त. ९.२२) मुनी संसारातून सुटतो २) जाईमरणाउ मुच्चइ (दस ९.४.१४) जन्ममरणांतून सुटतो ३) इमाओ मेल्लावह ममं। (सुद १२.११२) याच्यापासून मला सोडवा.
८) रक्षण : (ज्यापासून रक्षण त्याची पंचमी) : १) किं समत्थं इणं मच्चुणो रक्खेउं। (समरा पृ. २८८) मृत्यूपासून रक्षण करण्यास हे समर्थ आहे काय? २) रक्खेहि मं इमाओ अणंगाओ। (समरा पृ. ३१६) या मदनापासून माझे रक्षण कर.
९) पराभव : (ज्यापासून पराभव त्याची पंचमी) : भग्गो कुक्कुडो बीयकुक्कुडाओ। (बंभ पृ. ५७) दुसऱ्या कोंबड्याकडून (पहिला) कोंबडा पराभूत झाला.
१) एतदर्शक धातु कधी षष्ठी घेतात.