________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४०९
अ) 'अन्य' शब्द अध्याहृत असताही पंचमीचा उपयोग केला जातो.
१) तुह पयसेवाए को परो धम्मो । (सुपास. ५२२) तुझ्या पदसेवेपेक्षा (दुसरा) कोणता श्रेष्ठ धर्म आहे? २) परोवयारी तुमाओ ण य को. वि. (लिला १०३९) तुझ्यापेक्षा (दुसरा) कोणीही परोपकारी नाही.
७) आरब्भ, अणंतरं, परं, आ (पासून, पर्यंत) या अव्ययांचा पंचमीची अपेक्षा असते.
१) आरब्भ : १) तद्दिणाओ आरब्भ। (महा पृ. १३३ ब) त्या दिवसापासून २) पवासदिवसाओ आरब्भ । (नल पृ. १७) प्रवास दिवसापासून २) अणंतरं : अणंतरं थूलभद्दाओ। (संपइ १.९७) थूलभद्दानंतर
३) पर : १) न नायपुत्ता परमत्थि नाणी। (सूय १.६.२४) ज्ञातपुत्रा (महावीरा) पेक्षां अधिक ज्ञानी कोणी नाही २) किं जीव नासाओ परं न कुज्जा। (दस ९.१.१५) जीवनाशापेक्षा अधिक काय बरे करेल?
४) आ : क) पासून : १) आ जम्माओ। (सुपास ५८८) जन्मापासून २) आ बालभावाओ चेव । (समरा पृ. २६) बालपणापासूनच ख) पर्यंत : १) आ बालभावाओ चेव । (समरा पृ. २६) बालपणापासूनच
ख) पर्यंत : १) आ सत्तमकुलाओ अत्थि पजत्तमम्हं दव्वं। (अरी पृ. ६) सात पिढ्यापर्यंत पुरेसे द्रव्य आमच्याजवळ आहे. २) आ सत्तमवंसाओ भोत्तुं दाउंच विलसिउं अत्थि धणसंचओ महंतो। (कथा पृ. ६२) सात पिढ्यापर्यंत, भोगण्यास, देण्यास, विलास करण्यासं (पुरेसा) महान् धनसंचय आहे.
८) खालील अर्थाच्या धातूंना पंचमीची अपेक्षा असते. १) अपादान', वियोग, विरह : (ज्यापासून अपादान त्याची पंचमी):
१) धम्माओ भंसेज्जा । (उत्त १६.१) धर्मापासून भ्रष्ट होईल २) चुयस्स धम्माओ। (दस ११.१३) धर्मापासून भ्रष्ट होईल. २) चुयस्स धम्माओ। धर्मापासून च्युत झालेल्याचे ३) ओसर ओसर करिहाओ। (अगड५६) हत्तीच्या मार्गातून मागे हो ४) करंडियाओ कड्डित्तु हारं। (बंभ पृ. ५९) करंडकांतून हार काढून १) बाहेर पडणे, दूर जाणे, पडणे, भ्रष्ट होणे, उतरणे, उठणे, पळणे, बाहेर
काढणे, ओढणे, च्युत होणे, चलित होणे इत्याद्यर्थक धातु