________________
४०८
अर्धमागधी व्याकरण
त्थं। (सुर १२.५५) अनुपलंभामुळे देहापेक्षा जीव भिन्न नाही, असे जे तू म्हणतोस ते अतिशय असंगत आहे.
४) गेलेला काळ (lapse of time) दर्शविताना पंचमीचा उपयोग होतो.
१) किमेत्तियाओ वेलाओ तुम्हे समागया। (बंभ पृ. ६३) तुम्ही इतक्या वेळाने का आला? २) बुहकालाओ चउत्थपाओ लद्धो। (धर्मो पृ. १३७) बऱ्याच काळाने चौथा पाय मिळाला.
५) तर-वाचक विशेषणांना पंचमीची अपेक्षा असते.
१) मूढतराए णं तुमं पएसी ताओ कट्टहारयाओ। (पएसि परि. २७) पएसी, तूं त्या काष्ठवाहकाये पेक्षाही अधिक मूर्ख आहे. २) तुमं एयाओ पविठ्ठतरो । (कथा पृ. ११४) तू याच्यापेक्षा अधिक पापिष्ठ आहेस. ३) मम भत्तुणो वि निग्धिणयरो। (जिन पृ. ३२) माझ्या पतिपेक्षा सुद्धा अधिक निघृण
अ) तर वाचकाचा उपयोग नसूनही, जरी तुलना गर्भित वा अभिप्रेत असेल तरीही पंचमीचा उपयोग केला जातो.
१) सीलं वरं कुलाओ दालिई भव्वयं च रोगाओ। विज्जा रज्जाउ वरं खमा वरं सुट्ठ वि तवाओ।। (वज्जा. ८५) कुलापेक्षा शील चांगले, रोगापेक्षा दारिद्र्य बरे, राज्यापेक्षा विद्या चांगली, त्यापेक्षा क्षमा पुष्कळच चांगली २) सीलाउ सुंदर किं पि । (सिरि १६९) शीलाहून दुसरे काहीहिं चांगले नाही
३) सग्गो च्चिय लुहओ णिय जम्मभूमीए। (लीला ३३८) स्वतःच्या जन्म भूमीपुढे स्वर्ग सुध्दा क्षुद्र.
६) तुलना वा भेद दाखविणाऱ्या 'अन्य' शब्दाला पंचमीची अपेक्षा असते.
१) अण्णो न पुण्णवं ममाहितो। (महा २.१४३) माझ्यापेक्षा दुसरा (कोणीही) पुण्यवान् नाही. २) न मोक्खसोक्खाहिंतो अण्णं सुहमत्थि। (धर्मो पृ. १६४) मोक्षसुखापेक्षा अन्य (चांगले) सुख नाही. १) कधी षष्ठी वापरली जाते. उदा. बहुदेसाणं पहाणयरो। (सुर १.४८)
पुष्कळदेशाहून अधिक प्रधान २) कधी षष्ठी वापरली जाते. उदा. १) पाषाण वि अब्भहिया। (सुर १.१०७)
प्राणापेक्षा सुद्धा अधिक. २) जाया बालचंदा पाषाण वि वल्लहा। (कथा पृ. १६६) बालचंदा प्राणपेक्षाही प्रिय झाली.