________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४०७
(अरी पृ. १०) हा माझ्या मित्राचा मुलगा विद्यार्थी (म्हणून) कोसंबीहून आला आहे. २) सलिलं च माणस सरवराओ तुह निमित्तं आणीय ( पाकमा पृ. ५५ः)
तुझ्यासाठी मानससरोवरातून पाणी आणले आहे.
क) पत्रांत :) सत्थि मलयामलाओ सुंदरि तुह माहवाणिलो लिहइ। (लीला ५०८) स्वस्ति, सुंदरी, मलयपर्वतावरून माहवाणिल तुला (पत्र) लिहित आहे.
आ) काल : १) बालभावाओ चेव मम नेहाणुरत्ता । (बंभ पृ. ६०) बालपणापासूनच माझ्यावर प्रेमाने अनुरक्त होती. २) पंढमदंसणाओ आरब्भ। (महा पृ. ८९ ब) प्रथमदर्शनापासून
२) वस्तूंचा वास्तविक वा लाक्षणिक उद्भव दाखविणारा शब्द पंचमीत ठेवला जातो.
१) बंभाणस्स मुहाओ विप्पा । (धूर्ता १.३७) ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण ( उत्पन्न झाले) २) न खलु इंधणेहिंतो चेव अवगमो सोयाणलस्स । (समरा पृ. ३९८) शोकाग्नि हा खरोखर इंधनातून (निर्माण) होत नाही. ३) न य सज्जणमुहाओ निंदा निग्गच्छइ । (कथा पृ. ४१) सज्जनांचे मुखांतून निंदा बाहेर पडत नाही ४) न य हिंसाओ हवइ धम्मो (समरा पृ. ४४०) हिंसेने धर्म होत नाही.
३) हेतु कारण दर्शविणारे शब्द पंचमीत ठेवतात.
१) तुज्झ सुयाइ पभावा मज्झ सुओ सुंदरी जाओ। (सिरि २७९) तुझ्या मुलीच्या प्रभावाने माझा मुलगा सुंदर झाला. २) अवच्चनेहाओ कओ गुरूणा अंसुवाओ। (धर्मो पृ. १५४) अपत्य स्नेहामुळे गुरूने अश्रु ढाळले.
अ) प्रत्यक्ष हेतु, कारण इत्यादी शब्दांचा उपयोग असताही कधी पंचमीचा उपयोग होतो. (मागे परिच्छेद ४०७ पहा)
आ) वादविवादात कारणदर्शक शब्द पंचमीत असतात
१) पुरिसवयणाणि अप्पमाणाणि, रागदोसाइससंभवाओ (धर्मो १५२) राग, द्वेष इत्यादी संभवत असल्याने माणसांची वचने अप्रमाण (होत)
२) जं भणसि नत्थि जीवो अन्नो देहाओ, अणुवलंभाओ, तमसंगयमच्च