________________
४०६
अर्धमागधी व्याकरण
होतो. २) संकप्पे से वहाय होइ । (दस ११.९) संकल्प त्याच्या नाशाला (कारण होतो) ३) अप्पवहाए नूणं होइ बलं उत्तुन्तण भुवणंमि। (पाकमा पृ. २०) जगात गर्विष्ठांचे बल खरोखर त्यांच्या नाशालाच (कारण) होते.
४) काही विशेषणांना चतुर्थीची अपेक्षा असते.
१) दुल्लहे सवणयाए। (पएसि परि पृ. २९) ऐकण्यास दुर्लभ २) किं अहं एयमट्ठस्स नो अरिहे सवणंयाए। (निरमा पृ. १०) ही गोष्ट ऐकण्यास मी योग्य नाही काय? ३) ते पारगा दोण्ह वि मोयणाए। (सूय १.१४.१८) दोघांच्याही मोचनाला ते समर्थ (आहेत.)
५) 'अलं' ला कधी चतुर्थीची अपेक्षा असते.
१) नालं ते तव ताणाए। (सूय १.९.५) तुझे रक्षण करण्यास ते समर्थ नाहीत. २) नालं ते मम ताणाय। (उत्र ६.३) माझे रक्षण करण्यास ते समर्थ नाहीत.
६) अगदी क्वचित् गंतव्याची चतुर्थी' आढळते. आगंता गब्भाय नंतसो (सूत्र १.२.१.९) अनंतशः गर्भात येईल.
४१० पंचमी विभक्तीचे उपयोग
१) कडून, पासून, जेथून या अर्थी स्थल काल वाचक शब्दांची पंचमी वापरतात.
अ) स्थल : १) एस मे मित्तस्स पुत्तो कोसंबीओ विजत्थी आगओ
१ घाटगे पृ. १९२ २) अशा उपयोगांतून क्रिया सातत्य दर्शविताना पंचमीचा उपयोग केला जातो.
उदा. १) सो पंचहिं धाईहि हत्था हत्थम्मि अंकओ अंक। गिण्हिज्जतो कुमरो।। (कुम्मा. १२४) पांच दाईंकडून (मा) हातांतून (त्या) हातात, (या) मांडीवरून (त्या) मांडीवर घेतला जाणारा तो राजपुत्र २) गब्भाओ गन्भं जम्माओ जम्मं नरगाओ नरगं। (सूय २.२.१०) (या गर्भातून (त्या) गर्भात (या) जन्मातून) (त्या) जन्मात (या) नरकातून (त्या) नरकात.