________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४०५
४०९ चतुर्थी विभक्तीचे उपयोग
अर्धमागधीत आढळणाऱ्या चतुर्थीच्या एव. व. च्या रूपांचा वापर प्रायः अगदी कमी प्रमाणात आहे. सामान्यतः चतुर्थीचे कार्य षष्ठीने केले जाते.
चतुर्थी ए. व. ची जी ‘आए' प्रत्ययान्त रूपे आढळतात. त्यांचा उपयोग प्रायः तुमन्ताप्रमाणे होतो. उदा. १) पहाटेरेत्थ गमणाए। (नयांस. पृ. १२६) जायचे ठरविले २) अणुजाणेसि मं गमणाए। महा ३५ अ) मला जाण्यास अनुज्ञा दे.
१) ज्याच्यासाठी एखादी क्रिया वा वस्तु त्याची चतुर्थी वापरतात. १) चेलगोलं कुमारभूयाए। (सूय १.४.२.१४) मुलासाठी चेंडू
२) भोगाय दव्वं। (नाण ४.५०) भोगासाठी द्रव्य ३) मोक्खत्थं पव्वजा। (कथा पृ. ८४) मोक्षासाठी संन्यास
२) क्रियेचा हेतु, उद्देश प्रयोजन दाखविणारा शब्द चतुर्थीत ठेवतात.
१) नो हंति ताणाय। (महा. पृ. १०१ ब) रक्षण करण्यास (समर्थ) होत नाहीत २) असुरो को वि ह पत्तो मज्झ विणासाय। (नाण १०.९७) माझा नाश करण्यास कोणीतरी असुर आला आहे. ३) गओ जलाणयणट्टाए। (कथा पृ. ८८) पाणी आणण्यास गेला.
३) परिणामवाचक शब्द चतुर्थीत ठेवला जातो. १) आयंके से वहाय होइ। (दस ११.९) रोग त्याच्या वधाला (कारण)
चतुर्थ्याः षष्ठी । हेम ३.१३१ कित्येकदा ‘आए' प्रत्ययान्त रूपांचा उपयोग न करता, अटुं (अत्थं) अट्ठा, अट्ठाए, अट्ठयाए यांचा उपयोग केला जातो. उदा. भिक्खट्ठा। (बंभ पृ. २५) भिक्षेसाठी, अप्पणो अट्ठाए। (विवाग पृ. ५७) स्वतःसाठी, अत्तहियट्ठयाए। (अभ्यंकर पृ. २४) आत्महितासाठी, इमस्स देहस्स पोसणट्ठाए। (पउम ३३.३७) हा देह पोसण्यास, धम्मसवणत्थं। (सुपास ६२९) धर्म ऐकण्यास, वंदणत्थं। (महा पृ. १७२ अ) वंदन
करण्यास ३) वैद्य पृ. ६१