________________
४०४
अर्धमागधी व्याकरण
भट्टे। (उत्त २०.४१) तप-नियम यापासून भ्रष्ट ३) णिव्विण्णो जम्मणमरणेहिं। (कथा पृ. १२२) जन्म मरणाने निर्वेद प्राप्त झालेला. ४) झरेइ रोमकूवेहिं सेओ दुरभिगंधओ। (बंभ पृ. ३७) घाण वासाचा घाम रंध्रांतून पाझरतो.
२२) कधी सप्तम्यर्थी तृतीयेचा उपयोग केलेला आढळतो.
अ) १) जो न सज्जइ एएहिं। (उत्त. २५.२९) जो यांत आसक्त होत नाही २) रूवेण य जोवणेण य लावण्णेण मुच्छिए। (विवाग. पृ. ३२) रूप, यौवन आणि लावण्य यांत आसक्त.
आ) १) सासंको हियएणं। (अगड २४१) हृदयात साशंक २) सोमो चित्तेण आउलो जाओ। (सुपास ५६७) सोम मनात आकुल झाला.
३) स एहिं २ काएहिं । (नायासं पृ. ६५) आपापल्या देहात ४) पुव्वणत्थेहिं भद्दासणेहिं निसीयंती। (राय पृ. ८४) पूर्वी ठेवलेल्या भद्रासनावर बसले.
इ) जेणेव चंपा नगरी .. तेणामेव उवागच्छइ। (नायासं पृ. १) जिकडे चंपा नगरी होती तिकडे गेला ई) काल दर्शवितांना : तेणं कालेणं तेणं समएणं। (नायासं पृ. १) त्या काळी त्या समयी
उ) सत्सप्तमी रचनेत :- १) तेहिं गएहि कमला कमेण पत्ता सुहेण उज्जेणिं। (सिरि ३०८) ते गेले असतां (गेल्यावर) कमला क्रमाने सुखरूप उज्जयिनीला पोचली २) सइ अन्नेण मग्गेण । (दस ५.१.६) दुसरा मार्ग असता ३) नच्चमाणीहिं विलासिणीहिं पंढतेहिं मागहेहिं .. नगरे पविसिउं पवत्तो। (धर्मो पृ. ११८) विलासिनी नाचत असतां. बंदीजन गात असता. नगरीत शिरू लागला.
१) जेणेव इति प्राकृतत्वात् सप्तम्यर्थे तृतीया यास्मिन्नेव देशे.. तेणामेव इति
तस्मिन्नेव देशे। मलयगिरी (राम पृ. २९) २) काहींच्या मते येथे तृतीया नसून तेणं कालेणं अशी सप्तमीच आहे. पहा.
ते णं कालेणं इत्यादी ते इति प्राकृत शैलीवशात् तस्मिन् इति द्रष्टव्यं.. णं इति वाक्याड्रे। राय (मलय) पृ. २३)