________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
अधिक असतो.
९) रहित : १) धणेण रहिओ । (पउम ३३.२३) धनरहित २) धम्माधम्मेण वज्जिया पुहई। (पउम ३.११२) पृथ्वी धर्माधर्मरहित होती.
१९) खालील अर्थाच्या क्रियापदांना तृतीयेची अपेक्षा असते.
१) उपरम' : कोडीहिं वि न उवरमइ मणोरहो। (अरी पृ. ११) कोटींनी सुद्ध मनोरथ थांबत नाही.
४०३
२) आहुति देणे : कयरेण होमेण हुणासि । ( उत्र १२.४३) कोणत्या होमाने आहुति देतोस?
३) निमंत्रण देणे : अद्धासणेण उवनिमंते । ( नायासं पृ. १४ ) अर्धासनाने (अर्धासन देऊन) निमंत्रिले
४) खाणे : दहिणा भुंजाहि । (पाकमा पृ. ४८) दही खा ५) शपथ घेणे : बंभणसच्चेण सावेऊण पुच्छइ । (वसु पृ. ३२० ) ब्राह्मण सत्याने शपथ घालून विचारतो.
२०) कधी द्वितीयेऐवजी तृतीयेचा उपयोग केलेला आढळतो. महया गंधद्धणिं मुंचंता । (राय पृ. १२) पुष्कळ वास सोडणारे)
२१) कधी तुलनेत पंचम्यर्थी तृतीया वापरली जाते.
१) गारत्थेहि य सव्वेहिं साहवो संजमुत्तरा । (उत्र ५.२०) सर्व गृहवासी जनांपेक्षा साधूंचा संयम अधिक चांगला असतो. २) रण्णो तुब्भे पाणेहिं पिययरा असि। (वसु पृ. २७०) राजाला तुम्ही प्राणपेक्षाही प्रिय होता. अ) इतरत्रही पंचम्यर्थी' तृतीयेचा उपयोग केलेला आढळतो.
१) जाहे तेहीं न भीओ' । (जेव्हा त्यांना भ्याला नाही) २) तव नियमेहि
१ ) एतदर्थक धातु प्राय: पंचमी घेतात.
२) असा उपयोग विरळ आहे.
३) महया इति प्राकृतत्वात् द्वितीयार्थे तृतीया, महतीं इत्यर्थः। मलयगिरी (राय पृ. १६)
४) पंचम्यास्तृतीया च। हेम ३.१३६
५) याकोबा Erza, पृ. ६०