________________
४०२
अर्धमागधी व्याकरण
३) कयं : कयं विगप्पेहि। (महा पृ. १९७ ब) विकल्प पुरे ! ४) धी : १) धी इमिणा जम्मेणं । (समरा पृ. १९०) या जन्माचा धिक्कार
असो!
२) धी मज्झजीविएण । (सुर २.४९) माझ्या जीविताचा धिक्कार !
५) धिरत्थु : १) धिरत्थु तो अम्ह जीएणं। (पउम ३३.९६) आमच्या जाविताचा धिक्कार असो ! २) धिरत्थु मे जीविएणं । (कथा पृ. ८५) माझ्या जीविताचा धिक्कार असो !
६) अलाहि : १) सोगेण । (महा पृ. २९४ अ) शोक पुरे ! २) अलाहि सेसोवएहि। (महा पृ. २३९ अ) बाकीचे उपाय पुरे !
७) नन्नत्थ : १) नन्नत्थ चउहिं वाहणेहिं। (उवा परि २१) चार वाहने सोडून २) नन्नत्थ दिव्वेणं उवाएणं। (नायासं पृ. १५) दिव्य (दैवी) उपाय सोडून.
१८) खालील (व तदर्थक) शब्दांना तृतीयेची अपेक्षा असते.
१) उत्कृष्ट : १) रूवेण य जोव्वणेण य लावण्णेण य उक्किट्ठा। (निरया पृ. ५.५) रूपाने, यौवनाने व लावण्याने उत्कृष्ट
२) हीन : १) हीणे कंतीए । (नायास पृ. १३३) कांतिहीन २) करूणाए परिहीणो। (सुपास ५००) करूणारहित
३) ऊन : १) पंच-दिवसेहिं ऊणं। (महा पृ. २५० अ) पाच दिवसांनी कमी
४) सम : १) मे कणगेण सरिसो वण्णो होउ। (पाकमा पृ. ४१) माझा सोन्यासारख्या वर्ण होऊ दे. २) जइ वि समो होइ भरहनाहेण। (जिन पृ. २५) जरी भरतनाथा सारखा असला.
५) युक्त : १) कम्मुणा तेण संजुत्तो। (उत्त १८.१७) त्या कर्माने युक्त
३) इत्थी कवडेण जुया। (नाण ८.८०) कपटाने युक्त स्त्री ४) विणएण संपन्ना। (सिरि ६१) विनयाने संपन्न.
६) अंकित : मुद्दाए अंकिओ । मुद्रांकित ७) सहित : १) नियचेडीहि सहिया। (जिन पृ. २६) आपल्या दासीसहित २) नियभजाहिं समेओ। (सुमास ५५५) आपल्या भार्यांनी सहित ८) अधिक : जो चेव बलेण अहिओ हवइ । (चउ पृ. ३६) जो बलाने