________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
४०१
कुसचीरेण तावसो ।। (उत्त. २५.३१) मुंडनाने श्रमण होत नाही. ओंकाराने ब्राह्मण होत नाही. अरण्यवासाने मुनी नाही. कुश- (तृणाच्या वस्त्राने तापस होत नाही. २) नाणेण य मुणी होइ तवेणं होइ तावसो । (उत्त २५.३२) ज्ञानाने मुनि व तपाने तापस होतो.
१६) किं (काय उपयोग?) कज, अट्ठ (अर्थ) गुण पज्जत्र (पर्याप्त) या शब्दांना तृतीयेची अपेक्षा असते.
१) किं : १) जइ चंदो किं बहुतारएहिं। (वज्जा २६६) चंद्र असेल तर पुष्कळ तारकांचा काय उपयोग? २) हत्थत्थे कंकणे किंदप्पणेणं। (पाइ पृ. ८९) हातच्या कंकणाला आरसा कशाला?
२) कज्ज (उपयोग आहे, काय उपयोग?) १) एएण मम कज्ज। (चउ पृ. २०) मला याचा उपयोग आहे.
२) न कज्जं मज्झ भिक्खेणं । (उत्तं २५.४०) मला भिक्षेचा उपयोग नाही. ३) किं रज्जेणं कजं। (सुपास ५०४) राज्याचा काय उपयोग?
३) अट्ठ (काम असणे, उपयोग असणे) : १) तेहिं नो अढे । एएणं अट्ठो। (भग पृ. ३४) त्यांचे काम नाही, याचे काम आहे. २) अट्ठो भंते भोगेहिं। (नायास पृ. २१८) महाराज, भोगांचे काय (उपयोग) आहे ?
४) गुण : १) को गुणो रज्जेणं। (समरा पृ. ५८१) राज्याचा काय उपयोग? २) को गुणो तेण। (सुपास ६३०) त्याचा काय उपयोग ?
५) पज्जत्त (पुरे) : १) तुह सेवाए मज्झ पज्जत्तं। (महा पृ. १९६ ब) तुझी सेवा मला पुरे। २) दोहिं चिमय पज्जत्तं बहएहि वि किं गुणेहि सुयणस्स। (वजा ४२) दोनच (गुण) पुरे आहेत. पुष्कळ गुणांचा सज्जनाला काय उपयोग?
१७) विणा, अलं, कयं, धी, धिरत्थु, अलाहि, नन्नत्थ (विना, सोडून) या अव्ययांना तृतीयेची अपेक्षा असते.
१) विणा : १) भावेण विणा दाणं न हु सिद्धि साहणं होइ। (सिरि १९) भावाविना दान सिद्धीचे साधन होत नाही. २) मेहेण विणा वुट्ठी न होइ। (पउम ४.२६) मेघाविना वृष्टि होत नाही.
२) अलं : १) अलं विसयसुहेहिं। (समरा पृ. ८४) विषय सुखे पुरे ! २) अलं अईयवत्थुचिंतणेणं। (समरा पृ. २१९) गत गोष्टींची चिंता पुरे !