________________
४००
अर्धमागधी व्याकरण
१०) गेलेला काळ (lapse of time ) ' दर्शविताना तृतीयेचा उपयोग होतो. १) अचिरेणेव कालेण दुक्खस्संतमुवागया । (उत्र १४.५२) थोड्याच काळाने त्यांच्या दुःखाचा शेवट झाला २) पंचहिं दिणेहिं लंघिऊण जलनिहिं। (समरा पृ. ३६७) पांच दिवसांनी समुद्र ओलांडून ३) हत्थी दम्मइ संवच्छरेण मासेण दम्मइ तुरंगो । महिला पुण किर पुरिसं दमे इक्केण दिवसेणं ।। धूर्ता ३.६७ ) एका वर्षात हत्तीचे दमन होते, महिन्यांत घोड्याचे, पण स्त्री मात्र एकाच दिवसांत पुरूषाचे दमन करते.
११) कधी अंतर दर्शविण्यास तृतीयेचा उपयोग केला जातो.
१) पुरी नक्खसिला अत्थि इओ दोहिं जोयणसएहिं । (नल पृ. ७) येथून दोनशे योजने (अंतरावर) तक्षशिला ( नावाची ) नगरी आहे. २) अत्थि इओ दसहिं जोयणेहिं । (समरा पृ. ३६३) येथून दहा योजने (अंतरावर) आहे.
१२) नक्षत्र निर्दिष्ट काल दर्शविताना नक्षत्रवाचक शब्द' तृतीयेत निक्खमई उ चित्ताहिं। (उत्र २२.२३) चित्रा नक्षत्रांत संन्यास घेतला.
१३) विशेष्याचे वैशिष्ट्ये दाखविणारा शब्द तृतीयेत ठेवला जातो. १) आसे जवेण पवरे। ( उत्त ११.१६) वेगाने उत्कृष्ट अश्व २) सक्को माहणरूवेण इमं वयणमब्बवी । ( उत्त ९. ६) ब्राह्मणरूपाने (येऊन) इंद्र हे वचन बोलला ३) ते चेव देवा सवरवेज्जरूवेण आगया।
(पाकमा पृ. ७५) तेच देव शबर वैद्यरूपाने आले.
१४) विशिष्ट स्थितिदर्शक शब्द तृतीयेत ठेवलेला आढळतो.
१) पुत्तत्तेण उववन्नो । (महा. पृ. २३ अ ) पुत्र म्हणून जन्मला २) ठिया अणंसणेणं । (सुपास. १२३) उपवास करून राहिले ३) काउस्सग्गेण ठिओ। (सुपास ५१२) कायोत्सर्ग (आसन) करून राहिला.
१५) एखादी विशिष्ट स्थिति दर्शविणारे लक्षण तृतीयेत ठेवतात. १) न वि. मुंडिएण समणो न ओंकारेण बंभणो । न मुणी रण्णवासेणं
१) म. : पुष्कळ दिवसांनी भेटला, फार वर्षांनी आला, थोड्या वेळाने पळाला इत्यादी
२) येथे सप्तमीऐवजी तृतीया आहे, असेही म्हणता येईल.