________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
३९९
१) द्वितीया : १) दुलहं माणुसजम्मं मा हारसु तुच्छ भोय सुहहेउं। (पाकमा पृ. ३५) तुच्छ भोगांच्या सुख कारणासाठी दुर्लभ मनुष्य जन्म गमावू नकोस. २) नो वत्थ स्स हेउं धम्मं आइक्खेजा। (सूय २.१.१५) वस्त्राच्या हेतूने धर्म सांगू
___२) तृतीया' : १) सामिणि मणे विसण्णा अजं तुमं हेउणा केण। (कुम्मा ५४) स्वामिनी, आज तू कोणत्या कारणाने मनांत विषण्ण झाली आहेस? २) जीयं पि यह परहिकारणेण धारिति सप्पुरिसा । (महा पृ. ७७ ब) सत्पुरूष हे जीवित सुध्दा परहिता कारणाने धारण करतात.
३) पंचमी : १) जइ मज्झ कारणा एए हम्मति सुबहू जिया । (उत्त. २२.१९) जर माझ्यासाठी हे पुष्कळ जीव ठार केले जाणार असतील. २) जो तं जीवियकारणा वंतं इच्छसि आवाउं । (उत्त. २२.४२) जो तू जीवितासाठी ओकलेले चाटण्याची (श-पिण्याची) इच्छा करतोस.
४) सप्तमी : १) एयस्स कारणे चेव पयावइणा निम्मिया एसा। (कथा पृ. ४) याच्यासाठीच ही प्रजापतीने निर्माण केली आहे. २) जइ अवच्चस्स कारणे एस मम भत्ता अन्न परिणिस्सइ। ( महा पृ. ३00 अ) जर अपत्यासाठी हा माझा पति अन्य स्त्रीशी विवाह करील.
९) दिशावाचक शब्द स्थितीदर्शक असता तो तृतीयेत ठेवतात. (तसेच इतर शब्दांच्या बाबतीतही)
१) एएणं मग्गेणं अत्थि महतं अईव कंतारं। (अगड. २०३) या मार्गावर फार मोठे अरण्य लागते. २) पच्छत्थिमेणं वरूणे महाराजा। (निरया पृ. ४२) पश्चिमेला वरूण महाराजा.
१) म. - काय कारणाने गेला? कोणत्या हेतूने आला होता? इत्यादी २) आणखी उदाहरण : इह भारहे वासे वेयड्डदाहिणेणं लवणस्स उत्तरेणं गंगानईए
य पच्चत्थिमेणं सिंधुनईए पुरथिमेणं... चक्कपुरं नाम नयरं। (कथा पृ. ११) ३) म. : त्या वाटेने कांटे फार आहेत. इत्यादी.