________________
३९८
अर्धमागधी व्याकरण
५) बरोबर असणारी सामग्री दाखविणारे पद तृतीयेत आढळते.
१) एगरहेणं कुमरो संचलिओ निमपुराहत्तं। (अगड १९७) एका रथासह राजपुत्र आपल्या नगराकडे चालला २) निग्गओ सव्वसामग्गीए जिणयत्तो। (जिन पृ. ३७) सर्व सामग्रीसह जिनदतत्त बाहेर पडला.
६) सह, समं सध्दिं या सहता दाखविणाऱ्या अव्ययांना तृतीयेची अपेक्षा असते.
अ) सह : कीलए सह इत्थिहिं। (उत्त. १९.३) स्त्रियांसह खेळतो (रमतो.
आ) समं : नाहं परपुरिसेण समं वच्चामि । (नल पृ. १७) मी परपुरूषाबरोबर जात नाही.
इ) सध्दिं : १) भुंजसु भोए मए सध्दिं । (सुपास ४८७) माझ्याबरोबर (सह) भोग भोग २) बंधुमईए भारियाए सध्दिं। (अरी. पृ. २०) बंधुमई भार्ये सह.
७) क्रियेची रीत’, पद्धत प्रकार दर्शविणारे पद तृतीयेत असते. १) मोणेण ठिओ सिट्ठी। (सुपास ५१२) श्रेष्ठी मौन धरून राहिला.
२) विणएण पविसित्ता। (दस. ५.१.८८) विनयाने प्रवेश करून ३) भत्तीए गायइ। (कथा पृ. ४७) भक्तीने गातो.
८) क्रियेचे कारण, हेतु प्रयोजन दर्शक शब्द तृतीयेत असतो.
१) नाणेण मोक्खो । वसु पृ. ३६०) ज्ञानाने मोक्ष २) होहिंति गुरूभत्तीए मणोरहसिद्धीओ। (महा पृ. ८६ पृ. अ) गुरूभक्तीने मनोरथ पूर्ण होतात. ३) लोभेण अन्नो गच्छिही । (अरी. पृ. ११) लोभामुळे दुसरा जाईल.
अ) प्रत्यक्ष हेतु, कारण, निमित्त इत्यादी शब्दांचा उपयोग असतां, द्वितीया, तृतीया, पंचमी वा सप्तमी वापरली जाते.
१ तृतीयेच्या अशा उपयोगांतून पुढीलप्रकारचे वाक्यांश : सुहं सुहेणं मज्झं
मज्झेणं, इत्यादी याबद्दल मलयगिरी (राय पृ. ४३) म्हणतो : गृहं गृहेणं मध्यं मध्येन परंपदेन सुखंसुखेन इत्यादयः शब्दाः चिरंतनव्याकरणे षु सुसाधवः प्रतिपादिता इति नायं अपप्रयोगः।