________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
३९७
६३) ओले वृक्ष सुद्धा दावाग्नीकडून जाळले जातात. ३) मुणिणा वि अप्पमाओ कायव्वो । (धर्मो पृ. २२६) मुनीने सुद्धा प्रमाद करू नये.
आ) १) राइणा भणियं। (समरा पृ. ३०) राजाने म्हटले २) कुलवइणा चिंतियं। (समरा पृ. ३२) कुलपतीने विचार केला.
इ) १) व तुमए संतप्पियव्वं। (समरा पृ. १०१) तू संताप करू नयेस २) न पहरियव्वं तुब्भेहिं। (समरा पृ. ५३८) तुम्ही प्रहार करू नये।
अ) सकर्मक क्रियापदांच्या कर्तरि प्रयोजक रचनेत मूळ कर्ता तृतीयेत ठेवला जातो.
१) उदायणे राया : बहस्सइ दतं पुरोहियं पुरिसेहिं गिण्हावेइ । (विवाग पृ. ३५) उदायण राजा बहस्सइदतत्तं पुरोहिताला सेवकांकडून पकडवितो २) सिरिदामे
राया.. नंदिसेणं कुमारं पुरिसेहिं गिण्हावेइ । (विभाग पृ. ३९) सिरि दाम राजा नंदिसेण कुमाराला सेवकांकडून पकडवितो. ___टीप : यावेळी अर्धमागधीत कधी मूळ कर्ता द्वितीयेत ठेवलेलाही आढळतो. (दस. ४ पहा) उदा. : १) नो वि अनंन वयावए। (एस ६.१२) २) नो वि गिण्हावए परं। (दस ६.१५) ३) सा विमलं वंदावइ ताण पायपउमं । (सुपास ६०४) तिने विमलाकडून त्यांचे पदकमलाला वंदन करविले.
२) क्रियेचे करण साधन-वाचक पद तृतीयेत ठेवतात.
१) जालेण मच्छए गेण्हइ । (कथा पृ. १०४) जाळ्याने मासे पकडतो २) नो तेसिमारभे दंडं मणसा वयस कायसाठ चेव । (उत्त. ८.१०) मनाने, वाचेने आणि देहाने त्यांची हिंसा करू नये.
३) त्याच क्रियापदाच्या नामाचीही तृतीया ठेवलेली आढळते.
१) निब्भच्छणाहीं निब्भच्छेइ । (निरया पृ. १४) निर्भर्त्सना करतो. २) केण वा मरणेण मरमाणे । (अंत ७४) आणि कोणत्या मरणाने मरणारा ३) जुझंति न अहमजुज्झेणं । (धर्मो पृ. १९६) अधर्मयुध्दाने युध्द करीत नाहीत.
४) सहतां, साहचर्य अभिप्रेत असतां तृतीयेचा उपयोग केला जातो. १) चलिओ चउरंगबलेण (चउ पृ. २५) चतुर्विध सैन्यासह निघाला.
२) से कणिए राया... सव्वबलेणं .. णिग्गच्छइ। (ओव पृ. ४८) तो कूणिय राजा सर्व सैन्यासह बाहेर पडला.