________________
३९६
अर्धमागधी व्याकरण
२७०) शिरश्छेदा विना २) मोत्तूण १) सय. मणुभवणं मोत्तुं कम्माण ण णिज्जरणमत्थि । (महा. पृ. १४५ अ) स्वतः अनुभवल्याशिवाय कर्मक्षय होत नाही. २) मुत्तूणं खुद्दजणं । (सुपास ५४३) क्षुद्र जन सोडून ३) पडुच्च (उद्देशून ) : सूरिं पडुच्च । संपइ (२.१२) सूरीला उद्देशून ४) पइ (कडे) १) तं पइ जंपइ जणणी । (सिरि. ३५०) आइ त्याला म्हणाली. २) जवेण तं पइ पहाविओ खुज्जो। (नल पृ. २८) खुजा वेगाने त्याच्याकडे धावला. ५) विणा नलं विणा । (नल पृ. १५) नला विना ६ ) आ ( पर्यंत) : १) आयन्नं आकड्डिय कोयंऊं (महा पृ. ५७ अ) धनुष्य आकर्ण ओढून २) तंच आकंठं पीयं अणेण । (महा पृ. ३३१ ब) आणि तो ते (पाणी) आकंठ प्याला.
आ) इतर अव्ययें :
१) जाव (पर्यंत) : १) अओ सूरूग्गमं जाव रक्खामि एयं । ( नल पृ. १४) म्हणून सूर्योदयापर्यंत मी हिचे रक्षण करीन २) जाव य ससिसूरगहचक्कं । (पउम १.१७) आणि जोपर्यंत सूर्य, चंद्र, ग्रहगण ( आहे)
२) धिद्धी : १) एगे भांति - धिद्धी रायाणं । (सिरि. १४७) काही म्हणाले राजाचा धिक्कार असो २) धिद्धी ममं गयविवेअं । (सिरि. ३२३) विवेक गेलेल्या माझा धिक्कार असो ।
३) धिरत्थु : धिरत्थु मम जीवियं । ( उत्त. २२.२९) माझ्या जीविताचा धिक्कार असो ।
६) क्वचित् षष्ठीऐवजी द्वितीयेचा उपयोग आढळतो.
तं
कूडागार
सालं अंतो (राय पृ. ११८) त्या कूटागार झालेच्या आत.
४०८ तृतीया विभक्तीचे उपयोग
१) सकर्मक क्रियापदांच्या कर्मणि प्रयोगात व भावे प्रयोगात कर्तृपद तृतीयेत जाते.
अ) १) अहं पराजिओ मोहमहामल्लेणं । (महा पृ. १५ ब) मोहरूपी महामल्लाने माझा पराभव केला. २) सरसा वि दुमा दावाणलेण उज्झंति । (वज्जा
१) द्वितीया षष्ठ्यर्थि (मलमगिरी (राय), पृ. १२४