________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
३९५
३) गत्यर्थक क्रियापदांचे गंतव्य द्वितीयेत ठेवले जाते.
१) मुणी खिप्पमुवेइ मोक्खं । ( उत्त. ४.८) मुनी लवकर मोक्षाला जातो. २) जंति... नरयं घोरं। ( पउम २.८९) घोर नरकाला जातात ३) गामं पविट्ठो (बंभ पृ. ४५) तो गावात शिराला ४) एवं परं पसिद्धिं पत्तो (सुपास ५७६) अशा प्रकारे तो खूप प्रसिद्ध झाला
४) स्थल', काल यांची मर्यादा दर्शविण्यास तद्वाचक शब्दांची द्वितीया वापरली जाते.
अ) स्थळ : १) पडपडणाओ पंचवीस जोयणाई आगओ रहो । ( नल पृ. ३२) वस्त्र पडल्यापासून रथ पंचवीस योजने आला आहे. २) तओ खणिऊण चत्तारि अंगुलाणि धरणिं । ( धर्मो पृ. ११८ ) मग चार अंगुले धरणी खणून.
I
आ) काळ : १) वीसमिऊण मुहुत्तं । (समरा पृ. ९) मुहूर्तभर विश्राती घेऊन. २) चिर कालं भोगे भुंजिऊण । (महा पृ. २३ अ) बराच काळ भोग भोगून ३) ठिओ सत्तरत्तं । ( नल पृ. १९) सात रात्री राहिला.
५) काही शब्दयोगी अव्यये व इतर काही अव्यये यांना द्वितीयेची अपेक्षा
असते.
अ) शब्दयोगी अव्यये : १) अंतरेण : सिरच्छेयं अंतरेण । (समरा पृ.
१) अर्धमागधीत गंतव्याची कित्येकदा सप्तमी आढळते. : १) गया सरज्जेसु सेसा । (बंभ पृ. ४०) २) दुग्गे पविसइ । (बंभ पृ. ५४) (३) अरण्णपरिसरे गच्छंतेसुं तावसकुमारेसु । (बंध पृ. ४८ ) ४) अहवा निप्पुन्नाणं न घरे चिंतामणी एइ। (महा पृ. २३३ ब )
२) कधी सप्तम्यर्थी काल दर्शविण्यास द्वितीयेचा उपयोग केलेला आढळतो.
१) अज्ज कसिणट्ठमीए रत्तिं इच्छामि साहिउं मंतं । ( जिन पृ. १९) आज कृष्णाष्टमीचे रात्री मंत्र साधण्याची माझी इच्छा आहे. २) सो रत्तिं आगओ। (पाकमा पृ. ४२) तो रात्री आला. ३) रत्तिं पज्जलियाण । (राय पृ. ८०) रात्रीं प्रज्वलित केलेल्यांचे (रत्तिं) इति सप्तम्यर्थे द्वितीया प्राकृतत्वात्। मलयगिरी (राय) पृ. ८३