________________
३९४
अर्धमागधी व्याकरण
महावीर तिक्खुत्तो वंदइ (निरया पृ. ६) श्रमण भगवान महावीराला तीनदा वंदन
करतो.
__ऊ) म्हणणे, करणे, समजणे मानणे इत्यादी सकर्मक धातूंच्या कर्मांची पूरके-नामे वा विशेषणे - द्वितीयेत असतात.
१) तं वयं बूम माहणं। (उत्त. २५.१९) त्याला आम्ही ब्राम्हण म्हणतो. २) गुरूरागग्गह गहिओ अलियं पि वियाणए सच्चं। (सुपास. ५१८) महा रागरूपी ग्रहाने पछाडलेला माणूस खोट्याला सुध्दा खरे मानतो.
ए) द्वितीयान्त कर्म ‘इति' पूर्वी आल्यास ते प्रायः प्रथमेत जाते. तर कधी ते द्वितीयेतही आढळते. रिध्दिमतं ति आलवे। (दस ७.५३) श्रीमंत माणसाला पाहून (त्याला) श्रीमंत म्हणावे.
२) प्रयोजक कर्तरि रचनेत अकर्मक, गत्यर्थक, ज्ञानार्थक, भक्षणार्थक व तदर्थक धातूंचा उपयोग असतां मूळ क्रियेचा कर्ता द्वितीयेत ठेवला जातो.
१) तुह तणयं जीवावइ एसो। (सुपास ५५५) तुझ्या मुलाला हा जिवंत करील २) कोहो पीइं पणासेइ। (दस ८.३८) क्रोध प्रीतीचा नाश करतो. ३) अन्नं न गच्छावेज्जा । (दस.४) दुसऱ्याला जावयास लावू नये. ४) पाएइ नलो सलिलं तं तिसियं। (नल पृ. १३) त्या तृषित (दमयंती) ला नलाने पाणी पाजले)
अ) सकर्मक क्रियापदांच्या प्रयोजक कर्मणि रचनेत अ व्यक्तिवाचक कर्म द्वितीयेत ठेवलेले आढळते.
१) काराविओ पाणिग्गहणं कुमारो। (बंभ पृ. ४६) कुमाराला लग्न करावायास लावले. २) ते जिणवरेण सम्मं मुणि दिक्खं गाहाविया सव्वे ।( महा. २.७०) त्या सर्वांकडून जिनश्रेष्ठाने योग्य प्रकारे मुनिदीक्षा घेवविली.
१ प्रथमा विभक्तीचे उपयोग पहा. इति' मागील कर्म प्रथमेत असणारी आणखी
इतर उदाहरणे : १) तहेव काणं काणे त्ति पडंग पडंगे त्ति वा । वाहियं वावि रोगि त्ति तेणं चोरे त्ति नो वए ।। (दस. ७. १२) २) न लवे असाहुं साहुत्ति साहु साहुत्ति आलवे। (दस ७.४८)