________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
७.५५) नेहमी दुष्ट वाणी टाळावी.
अ) सकर्मक क्रियापदाचे व का. धा. वि. धातुसाधित नाम, ल्यबन्त आणि तुमन्त यांच्या कर्माची ही द्वितीया विभक्ती असते.
(धातु नाम) : धम्मं आराहगा वयं। (सूय १.१.२.२०) आम्ही धर्माचे आराधक आहोत. (व. का. धा. वि.) : १) पुव्वदुक्कडाइं गरहंतेण। (नल पृ. १९) पूर्व दुष्कृत्यांची निंदा करणाऱ्याने २) जुत्ताजुत्तं अयाणमाणेही । (महा पृ. ५८ अ) युक्तायुक्त न कळणाऱ्या त्यांनी (ल्यबन्त) : १) पुत्तं ठवेत्तु रज्जे। (उत ९.२) पुत्राला राज्यावर ठेवून. २) धम्मं सोऊण । (उत्त १३.२) धर्म ऐकून (तुमन्त) : १) जुत्तं अणसणं काउं। (बंभ पृ. ३४) उपवास करणे योग्य आहे. २) तुब्भे समत्था उध्दत्तुं परमप्पाणमेव य। (उत्त २५.३९) दुसऱ्याचा व स्वतःचा उद्धार करण्यास तुम्ही समर्थ आहात.
आ) द्विकर्मक धातूंची दोन्ही कर्मे द्वितीयेत असतात.
१) जिणेमि रजं नलं। (नल पृ. ९) नल (व) राज्य जिंकीन २) तओ नमी रायरिसी देविंद इणमब्बवी । (उत्र ९.८) मग नमी राजर्षि देवेंद्राला हे म्हणाला ३) अन्नं पि देवं जाएमि। (समरा पृ. ६३९) राजाला मी आणखीही काही मागीन
इ) द्विकर्मक धातूंच्या कर्मणि प्रयोगांत व्यक्तिवाचक कर्म द्वितीयेत असते.
१) मग्गेयव्वो देवो आहरणं। (सुपास ५१८) राजाजवळ अलंकार मागावास २) अहं तए अक्खाणयं पुच्छेयव्वा। (चउ पृ. ४१) तू मला आख्यानाबद्दल विचारावेस
ई) कधी त्याच क्रियापदाच्या नामाचा उपयोग करून ते द्वितीयेत ठेवले जाते
(अकर्मक क्रियापद असता) : १) सकाममरणं मरई। (उत्त. ५.३९) सकाममरण मरतो २) पव्वजामि पव्वजं। (समरा पृ. १५३) संन्यास घेतो.
(सकर्मक क्रियापद असता) : १) वरसु वरं (महा पृ. १६३ ब) वर माग २) धम्मज्झाणं झियायई। (उत्त. १८.४) धर्मध्यान करतो. उ) कर्माशी एकविभत्रिक असणारे शब्द द्वितीयेत असतात. समणं भगवं
१) म. लढाई लढतो, घेणे घेतो, देणे देतो, गाणे गातो इत्यादी