________________
३९२
अर्धमागधी व्याकरण
६) कधी द्वितीये ऐवजी प्रथमेचा उपयोग केलेला आढळतो.
१) चइऊण रायवरलच्छी । ( पउम ४.८९ ) सुंदर राजलक्ष्मी टाकून २) कालेणं कुमारे अहं जीवमाणं पासिज्जा । (निरया पृ. ५)
'काल' कुमाराला मी जिवंत पाहीन ? ३) देवउले बोलिअण सा रयणी । अगड २८६) देवळात ती रात्र घालवून.
७) खालील ठिकाणी षष्ठीऐवजी प्रथमेचा उपयोग आढळतो
समाइ पेहाइ परिव्ययंतो सिया मणो निस्सरई बहिद्धा । (दस ३.४) समदृष्टीने (पहात) हिंडणाऱ्या (भिक्षू) चे मनसुध्दा कदाचित् बाहेर जाईल.
४०७ द्वितीया विभक्तीचे उपयोग
१) कर्तरि प्रयोगांत सकर्मक क्रियापदाचे उक्त कर्म द्वितीयेत असते. १) निव्वाणं पाउणंति ते । (सूय १.११.२१) ते निर्वाण मिळवितात. २) सुहय अहं निनद इयं वावाइस्मामि तुज्झ पच्चक्खं। (अगड ३१५) भल्या माणसा, तुझ्या देखत मी माझ्या प्रियकराला ठार करीन. ३) दंसेहि तं पएसं। (बंभ पृ. ५५) तो प्रदेश दाखव. ४) गिरं च दुट्ठढ परिवज्जए सया । (दस
१) डॉ. घाडग्यांच्या मते (पृ. १८६) अशा ठिकाणी प्रथमा नसून द्वितीयेच्या ए. व. च्या रूपांतील अन्त्य अनुस्वार लुप्त होऊन तो स्वर दीर्घ झालेला असतो. हेमचंद्राने (३.१३७) म्हटले आहे की, 'प्रथमाया आणि द्वितीया दृश्यते’। याच्या व्यत्ययाने द्वितीयेऐवजी प्रथमेचा उपयोग होतो, असे म्हणण्यासही हरकत नसावी.
२) अभ्यंकर दस. टीपा पृ. ८
३) अ) अर्धमागधीत काही अकर्मक क्रियापदे द्वितीयान्त कर्म घेताना आढळतात. १) पुहइं भमंताण। (सुपास ६४७) २) विहरइ वसुहं संवच्छरं धरिते (पउम ३.१३९)
आ ) संस्कृतमधील काही अकर्मक क्रियापदे सकर्मकाप्रमाणे वापरलेली आढळतात. रोएमि निग्गंथं पावयणं । (उवा. परि १२) मला निग्गंथ प्रवचन आवडते.