________________
प्रकरण २४ : विभक्तींचे उपयोग
३९१
पूरकाची-नाम वा विशेषण कर्मणि प्रयोगात प्रथमा असते.
(नाम) : १) संसारो अण्णवो वुत्तो। (उत्र २३.७३) संसाराला सागर म्हटले आहे. २) तं मित्तं कायव्वं। (वजा ६८) त्याला मित्र करावे. (विशेषण) : १) से हु चाइ त्ति वुच्चइ । (दस २.३) त्याला त्यागी म्हटले जाते. (२) बहवे इमे असाहू लोए वुच्चंति साहुणो । (दस. ७..४८) जगातील हे पुष्कळ असाधु साधु म्हटले जातात.
३) कर्मापुढे 'इति' शब्दाचा उपयोग केलेला असल्यास ते प्रायः प्रथमेत ठेवतात.
१) सरीरमाहु नाव त्रि । (उत्त. २.३.७३) देहाला नाव म्हणतात २) कडं कडे त्ति भासेज्जा अकडं नो कडे त्ति य । (उत्त १.११) केले असल्यास केले म्हणावे, केले नसल्यास नाही केले असे म्हणावे
४) वस्तूंची यादी देतानाही प्रायः प्रथमेचा उपयोग आढळतो.
सासे कासे जरे दाहे । (विवाग. पृ ७) दमा, खोकला, ज्वर, दाह (इत्यादी रोग)
५) अहो, धी, धिद्धी, धिरत्थु आणि हद्धी या अव्ययांचा उपयोग असता कधी कधी प्रथमेचा उपयोग केलेला आढळतो.
अ) अहो : १) अहो दारूणो संसारवासो । (समरा पृ. ४१) संसारवास दारूण आहे । २) अहो असारया संसारस्स । (समरा पृ. ७२५) संसाराची असारता ।
आ) धी : १) धी संसारो असारो । (महा. पृ. ६८ ब) धिक् संसार असार (आहे)
२) धी संसारो। (समरा पृ. ७५८) संसाराचा धिक्कार असो ।
इ) धिद्धी : धिद्धी धणलवमित्तात्थिणो इमे सव्वे (सिरि १०४) फक्त लवमात्र धनाची इच्छा असणाऱ्या या सर्वांचा धिक्कार !
उ) धिरत्थु : धिरत्थु एयस्स देवसद्दो । (समरा पृ. ३२५) याच्या राजा देव या पदवी (शब्दा) चा धिक्कार असो !
ऊ) हद्धी : हद्धी धिरत्थु पावो । (जिन पृ. २०) (या) पाप्याचा धिक्कार असो.