________________
३९०
अर्धमागधी व्याकरण
मियग्गामे नामं नयरे होत्था । (विवाग पृ. २) मियग्गाम नावाचे नगर होते.
आ) काशी (कर्तृपद उक्त वा अनुक्त असेल ) एक विभक्तीक असणारे शब्द प्रथमेत असतात (कर्तृपद उक्त) : तुह पिया अहं निसहो। (नल पृ. २७)मी तुझा बाप निसह (कर्तृपद अनुक्त) : एगागी गच्छइ गिहाओ । (सुपास ६४१) (तो) एकटा घरांतून गेला.
इ) होणे, असणे, वाढणे, दिसणे इत्यादी अकर्मक क्रियापदांच्या कर्त्यांची पूरके - नामे वा विशेषणे - प्रथमेत असतात.
(नामे) : १) अणाहोमि महाराय नाहो मज्झ न विज्जई । (उत्त २०९) महाराज, मी अनाथ आहे, मला नाश नाही २) तएणं से उदायणे
कुमारे राया जाए । (विवाग. पृ. ३४) मग तो उदायण कुमार राजा झाला. (विशेषणे) : १) जाओ निरामओ हं । (सुपास ५७५) मी निरोगी झालो २) तुमं महप्पभावो लक्खिज्जसि (वसु पृ. ३४८) तू महाप्रभावी दिसतोस ३) तुज्झ विरहे नरनारी संकुलं इमं नयरं अडविसमाणं .. पडिहाइ । (पाइ पृ. ४) तुझ्या विरहांत, स्त्रीपुरूषांनी भरलेले हे नगर अरण्याप्रमाणे भासते.
२) कर्मणि प्रयोगात उक्त कर्म प्रथमा विभक्तीत असते
क) अ) (क्रियापदाचा उपयोग असता) १) सुव्वंनि दारणा सड्ढा (उत्त ९.७) दारूण शब्द ऐकले जातात. २) दिजंति तंबोलाई । (पउ पृ. २६) तांबूल दिले जातात.
आ) (क. भू. धा. वि. चा उपयोग असता) : १) दिट्ठो सो तेहि एगागी। (अगड ३०६) त्यांनी त्याला एकटा पाहिले २) सा.. उक्का उरगेण। (अगड. २६६) तिला साप चावला.)
इ) (वि. क. धा. वि. चा उपयोग असता) : १) न हिंसियव्वा पाणिणो न भासियव्वं अलियं। (जिन पृ. ६९) प्राण्यांची हिंसा करू नये, खोटे बोलू नये.
२) धारियव्वाणि पंचमहव्वयाणि। (जिन पृ. ७१) पंच महाव्रते पाळावीत
ख) द्विकर्मक धातूंच्या कर्मणि प्रयोगात व्यक्तिवाचक कर्म प्रथमेत येते : १) कुमरेण मुणी इमं पुट्ठोढो (सुर १५.११२) कुमाराने मुनीला हे विचारले २) गुरूणा सो इमं भणिओ । (धर्मो पृ. १०७) गुरूने त्याला म्हटले.
ग) म्हणणे, करणे, समजणे इत्यादी सकर्मक क्रियापदांच्या कर्मांच्या