________________
प्रकरण २४) विभक्तींचे उपयोग
888888888888888888888888888888888888888888888888888888
४०५ विभक्तींचे उपयोग
संस्कृतमधील आठौं विभक्तीपैकी चतुर्थी सोडून इतर विभक्ती अर्धमागधीत आहेतच. त्यांचे उपयोग प्रायः संस्कृतमधील उपयोगाप्रमाणेच होतात हे उपयोग पुढे दिले आहेत.
४०६ प्रथमा विभक्तींचे उपयोग
१) कर्तरि प्रयोगात कर्तृपद प्रथमेत असते.
१) को चित्तेइ मउरं गई च को कुणइ रायहंसाणं । (अगड ७५) मोराला कोण रंगवितो व राजहंसाला गति कोण देतो? २) रक्खिंसु मराहिवा। (महा पृ. ४७ ब) राजांनी रक्षण केले. ३) करिही रजं महनंदणो । (संपइ. १.६७) माझा मुलगा राज्य करील. (४) जाणंतु ता इमे समणा। (दस पृ. ५.२.३४) हे श्रमण (असे) जाणू देत. ५) तया तुम साहं गेण्हेजासि । (चउ. पृ. १७) तेव्हा तू फांदी पकडावीस
अ) कर्तृपदाशी 'नाम' ने जोडेलेला शब्द प्रथमेत असतो. १) बारवई नाम नयरी होत्था । (अंत ५) बारवई नावाची नगरी होती २)
१) येथे कर्ता कर्म च करणं सम्प्रदान तथैव च । अपादानाधिकरणमित्याहुः कारकाणि षट्
।। हे सहा कारक संबंध आहेत. अर्धमागधींत यातील चतुथीचे (सम्प्रदान) कार्य षष्ठीने केले जाते. अर्धमागधीत चतुर्थी ए. व. ची जी काही रूपे आढळतात. त्यांचाही कधी कधी उपयोग केलेला आढळतो. पण प्रायः चतुर्थी विभक्तीचे कार्य षष्ठी विभक्तीकडूनच करवून घेतले
जाते. ३) प्रथमेने लिंगाचाही बोध होतो. उदा. धम्मो, सुहं, जीवदया इत्यादी