________________
३८८
अर्धमागधी व्याकरण
८) सामान्य विधानातही अ. व. चा उपयोग आढळतो :
१) बीया ण अग्गिदड्डाण पुणरवि अंकुरूप्पत्ती न भवइ । (ओव सू. १५५, पृ. ९३) दग्ध बीजांतून पुनरपि अंकुर उत्पत्ति होत नाही २) सव्वे अथिरा संसारे पयत्था। (चउ पृ. २२) संसारातील सर्व पदार्थ अस्थिर आहेत.
४) प्रथम, द्वितीय व तृतीय पुरूषात आदरार्थी अ. व. चा उपयोग आढळतो.
अ) प्र. पु. : एएण कारणेण एएहि न बंदिया अम्हे। (कुम्मा. १८४) या कारणाने त्यांनी आम्हाला (मला) वंदन केले नाही.
आ) द्वि. पु. : १) एवं ताय वियाणह। (उत्त. १४.२३) बाबा, तुम्ही (तू) असे जाणा. २) तुम्हाणं चेव पयपसाएणं। (अगड. १०८) तुमच्या (तुझ्या) पायांच्या प्रसादाने.
इ) तु. पु. : १) अन्नदियहम्मि सबहमाणं वाहराविया आयरिया। धर्मो. प. ४३) दुसरे दिवशी बहुमानपूर्वक आचार्यांना (ला) बोलविले २) आदिसं तु गुरुणो । (धर्मो पृ. १७१) गुरूंनी (०ने) आदेश द्यावा.
५) विशेषनामांच्या अ. व. ने वंश गोत्र यांचा निर्देश होतो.
तिहुयण-भुवणस्सुवरिं इक्खागूणं न होइ कह वंसो। (महा. २.१३०) इक्ष्वाकुंचा वंश। त्रिभुवनात कसा बरे वर असणार नाही?
६) संस्कृतमध्ये जे शब्द नेहमी अ. व. त वापरले जातात. ते अर्धमागधीतही प्रायः अ. व. त आढळतात. उदा. १) किं धरिएहिं इण्डिं इमेहिं पाणेहिं। (सुर. १४.३) आता प्राण धारण करून काय उपयोग? २) कुमार-उत्तमंगे अक्खए पक्खिवइ। (बंभ. पृ. ४५) कुमाराच्या मस्तकावर अक्षता फेकल्या.
७) अ. व. च्या पुढील वैशिष्टपूर्ण उपयोगात ए. व. ऐवजी अ. व. चा उपयोग आढळतो. - भणइ सुमित्तो निसासु वणमालं (पउम. १२.१९) रात्री सुमित्र वणमालेला म्हणाला.
१ घाडगे, पृ. १८४ २ उदा. दाराः, सिकताः, अक्षताः, आपः, प्राणाः, वर्षाः, इत्यादी ३ क्वचित् ए. व. चा उपयोग - आउ। (सूय १.१.१.१८) पाणी