________________
प्रकरण २३ : वचनांचे उपयोग
३८७
देह मे कट्ठाणि। (समरा पृ. ४८०) मला काष्ठे द्या ४) ऊरुमंसाणि छेत्तूण ।
(धर्मो पृ. १९८) मांडीचे मांस तोडून अ) यावेळी अ. व. ने कधी प्रकार निर्दिष्ट होतो.
निहिं उदएहिं मज्जावेइ । (विवाग पृ. ५४) तीन प्रकारच्या पाण्यांनी स्नान घलतो.
४) देशनामे ' : करकंडू कलिगेसुं पंचालेसु य दुम्मुहो। नमी राया विदेहेसु गंधारेसु य नग्गई ।। (उन १८.४६) कलिंगात करकंडू, पांचालात दुम्मुह, विदेहात नमी राजा व गांधारात नग्गई.
५) ऋतुनामे २ : आयवयंति गिम्हेसु हेमंतेसु अवा उडा । वासासु पडिलीणा।। (दस ३.१२) ग्रीष्मात (स्वतःला) तापवितात. हेमंतात वस्त्ररहित, वर्षा ऋतूत आश्रय घेतलेले.
६) नक्षत्र नामे : १) अह निक्खमई उ चित्ताहिं। (उत्र २२.२३) नंतर चित्रा (नक्षत्र) असता संन्यास घेतला. २) चेत्तबहुलट्ठमीए उत्तरसाढासु अद्धरत्तम्मि.. जाओ सो। (महा. २.७) चैत्र कृष्णाष्टमीचे मध्यरात्री उत्तराषाढा नक्षत्र असता तो जन्मला.
७) मुळात अनेक असणाऱ्या वस्तु दर्शविण्यास अ. व. चा उपयोग होतो. १) पिंगला सीसकेसा । (कथा पृ. ४७) डोक्याचे पिंगट केस २) छज्जति तीए अलया। (धर्मो पृ. १३) तिचे केस शोभतात.
कधी ए. व. चा उपयोग आढळतो : तेणं कालेणं २ पंचाले जणवए कंपिल्लपुरे नयरे । (नामा पृ. १०८) पुंडो नाम जणवओ। (समरा पृ. २२५) देशनात्तापुढे देश, विषय इत्यादी शब्द असल्यास ए. व. वापरले जाते. उदा. १) अत्थि इह भरहखित्ते कोसलदेसम्मि कोसला नयरी। (नल पृ. १) २) अत्थि अवंतीविसए उज्जेणी पुरवरी रम्मा। (सुपास. ५२९) कधी ए. व. चा उपयोग आढळतो. : रेहइ ताराणुगओ सरए संपुन्न चंदो व्व। (धर्मो पृ. २७) ससि व्व सरयम्मि । (धर्मो पृ. २७) पुढे नक्षत्र शब्द असता ए. व. चा वापर आढळतो. : फगुणबहलेक्कारसीए उत्तरासाढानक्खत्ते ... भगवओ केवलनाणं समुप्पण्णं । (महा पृ. ९ अ)
२
३