________________
३८६
I
नद्यांच्या मध्ये एक रमणीय देऊळ होते. २) ओट्ठे वि छिंदंति दुवे वि कण्णे । (सूय १.५.१.२२) दोन्ही ओठ व कान कापतात.
२) अनेक वस्तु, व्यक्ति इत्यादी दर्शविण्यास अ. ब. चा उपयोग होतो. १) सुगेज्झाणि सज्जणहिययाणि । (समरा. पृ. ५४०) सज्जनांची हृदये जिंकणे सोपे असते. २) कम्माणि बलवंति (उत्त. २५.३० ) कर्मे बलवंत असतात. ३) विचित्ताणि खु विहिणो विलसियाणि । (समरा पृ. २०३ ) दैवाचे खेळ विचित्रच असतात.
३) वस्तूंचा वर्ग, जाति दर्शविण्यास अ. व. चा उपयोग होतो.
१) आवयाए वज्जकढिणहियया चेव महापुरिसा हवंति। (समरा. पृ. २०८) मोठे लोक संकटात वज्राप्रमाणे कठिण हृदयाचे होतात. २) खमापहाणा य हुति सप्पुरिसा। (सुपास. ५१५) सत्पुरूष क्षमाप्रधान असतात.
४) पुढील परिस्थितीत अ. व. चा उपयोग केलेला आढळतो.
१) निसर्गवस्तु' : १) थोवंतरेण पणट्ठा वाया । (चउ. पृ. २९) थोड्या वेळाने वारे थांबले २) सोया भणीओ विव विहायंति रमणावलीओ। (समरा. पृ. २१२) विजेप्रमाणे रत्नावली चमकल्या.
२) अमूर्त पदार्थ : १) उत्तमाई सोक्खाइं । ( नाण २.८९) उत्तम सौख्ये २) हियइच्छियाइं लोयम्मि पुण्णेहिं विणा ण हु संपडंति सइ सज्जणाणं पि । (लिला. २२३) जगात सज्जनांच्या बाबतीत सुद्धा मनोवांछिते नेहमीच पुण्याविना पूर्ण होत नाहीत.
३) अमेय पदार्थ : १) पाइओ मि जलतीओ वसाओ रुहिराणि य। (उत्त. १९.७०) कढत वसा व रक्त मला पाजण्यात आले २) बहुताण तणाइँ वि हत्थावलंबत्तणमुवेंति। (लिला. १९३) बुडत्याला गवताच्या काडीचा आधार ३)
१
अर्धमागधी व्याकरण
२
३
कधी ए. व. चा उपयोग आढळतो : १) अह वाइउं पवत्तो वाओ । (पउम ४.१३) २) वायइ अइसीयलो वाओ । (सुर ७.१८६)
कधी ए. व. चा उपयोग आढळतो. १) लद्धा कह वि तीए चेयणा । (समरा. पृ. ३०८ ) २) इयं उज्जाणरिद्धी। (समरा. ३११) ३) अवगया मोहवासणा। (समरा पृ. ७१८) कधीं ए. व. चा उपयोग आढळतो. १) पज्जालिया वसाए पईवया । (धर्मो पृ. १८० ) २) पक्खित्तं बलीए सह रूहिरं । (धर्मो पृ. १८०) ३) मंसे मज्जे य इत्थिसु पसत्ता। ( कथा पृ. २०)