________________
प्रकरण २३ : वचनांचे उपयोग
३८५
पृ. १८) चंद्र मही धवल करतो ३) सूरस्स पुरो खजोयगाण का होइ देहपहा। (महा पृ. १३५ ब) सूर्यापुढे काजव्यांच्या देहाची कसली प्रभा?
३) एकजिनसी, एकप्रकारक, वस्तु दर्शविण्यास ए व चा उपयोग होतो. १) पउरजणं संमाणेऊण । (समरा पृ. १२) पौरजनांचा सन्मान करून २) अत्थरहिओ खु पुररिसो अपुरिसो चेव। (समरा पृ. २०१) अर्थ रहित पुरूष हा पुरूष नव्हेच.
४) अनेकांचा समूह दर्शविण्यास ए. व. चा उपयोग होतो.
१) जणो पहट्ठमणो भणिउमाढत्तो (महा. पृ. १५ ब) ज्यांचे मन आनंदित झाले आहे असे (ते लोक बोलू लागले. २) तरूणी जणो ताण समीवं गओ। (बंभ पृ. २८) तरूण स्त्रिया त्यांच्याजवळ गेल्या.
५) वस्तूंचा वर्ग, जाति दाखविण्यास ए. व. चा उपयोग होतो.
१) मउहो वि मइंदो करिवराण कुंभत्थलं दलइ। (जिन. पृ.६१) सिंहाचा छावा (श. लहान सिंह) सुद्धा गज श्रेष्ठांची गंडस्थळे फोडतो. २) सप्पे वि दिण्णखीरं तं चेव वि सत्तणमुवेइ । (जिन पृ. ६९) सापाला जरी दूध पाजले (श. दिले) तरी त्याचे विषच होते.
६) अनेक वस्तु वा व्यक्ति दर्शविण्यास कधी ए. व. चा उपयोग होतो.
१) सव्वं चिय संसारियं वत्थु विवागदारूणं। (समरा पृ. १७६) संसारातील सर्वच वस्तु परिणामी दारूण आहेत. २) पाएण लोओ भिन्नरूई। (समरा पृ. ७१५) प्रायः लोक भिन्न रूचीचे असतात.
७) ए. व. चा एक वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असा आढळतो. दसद्धवण्णे कुसुमे। (भग; पृ. ३) पंचरंगी फुले.
४०४ अनेकवचनाचे उपयोग
१) द्विवचनाच्या ऐवजी अ. व. चा उपयोग केला जातो.
अ) १) कण्णेसु कुंडलाइं भयासु माणिक्ककडयाइं । (पउम ३.९८) कानात कुंडले, बाहूवर कडी २) थरहरंति मे ऊरू । (समरा पृ. ३१९) माझ्या मांड्या कांपत आहेत.
आ) दो चा उपयोग असता : १) सरियाण दोण्ह मज्झे देवउलं अत्थि रमणीयं। (अगड २२८) दोन