________________
BRERERAERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
प्रकरण २३
वचनांचे उपयोग
४०२ वचनांचे उपयोग
अर्धमागधीत एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने आहेत. द्विवचन' नसल्याने द्विवचनाचे कार्य अनेकवचनानेच केले जाते. ए. व. आणि अ. व. यांचे उपयोग पुढीलप्रमाणे होतात.
४०३ एकवचनाचे उपयोग
१) एक वस्तु, व्यक्ति इत्यादी दर्शविण्यास ए. व. चा उपयोग होतो. उदा. १) धम्मेण कुलपसूई धम्मेण य दिव्वरूवसंपत्ती । धम्मेण धण समिध्दी धम्मेण सुवित्थडा किती ।। (समरा पृ. ४) धर्माने (चांगल्या) कुळांत जन्म, दिव्यरूपाचा लाभ, घनसमृद्धी मोठी कीर्ति ( प्राप्त होतात) २) वरजुवइ विलसिएणं गंधव्वेण च एत्थ लोयंमि। जस्स व हीरइ हिययं सो पसुओ अहव पुण देवो ।। (नाण १०.२९४) सुंदर स्त्रियांच्या विलासाने आणि गायनाने ज्याचे हृदय आकृष्ट होत नाही तो पशु अथवा देव होय.
२) ज्या वस्तु एकच आहेत. त्या ( प्रायः ) ए. व. त ठेवल्या जातात. १) बहुरयणा वसुंधरा । (जिन पृ. १६) बहुरत्ना वसुंधरा २) चंदो धवलेइ महिं । (जिन
१
२
३
४
दो, दुवे, दोन्नि (दोण्णि), (बे) ही द्विवचनी रूपे तेवढी अर्धमागधीत आढळतात. द्विवचनस्य बहुवचनम्। हेम ३.१३० उदा. कण्णेसु असुभो मलो । (बंभ पृ. ३७ ) दोन हा विशेष अर्थ सांगावयाचा असल्यास, अनेकवचनामागे दो, दुवे, दोन्नि यांचा उपयोग केला जातो. उदा. आगया दुवे तावसकुमारया। (समरा पृ. १३)
प्राकृते हि वचनव्यत्ययोऽपि भवति । मलयगिरि (राय) पृ. १७१