________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३८३
स्थल :- कत्थइ :- कत्थइ सीहवियारिय रुहिरच्छडारुणं भीमं ।
कत्थइ सीह भयद्दुय हरिण पलायंत संघायं । (वणं) (पउम ३३.६,८) कुठे सिंहाने फाडलेल्या उत्कृष्ट हतींच्या रक्तांच्या सड्याने लाल व भयंकर दिसणारे, (तर) कुठे सिंहाच्या भयाने जेथे हरणांचे कळप पळत सुटले आहेत असे (वन)
(३) एकीकडे - दुसरीकडे या अर्थी दोन अव्ययांचा उपयोग :
(१) एगत्त मज्जाया पल्हत्थिज्जइ कुलक्कमपरुढा । अन्नत्तो मरइ पिया। (महा.३.३५) एकीकडे कुलक्रमागत मर्यादा टाकावी लागते, दुसरीकडे प्रिया मरते आहे. (२) एगत्तो गुरुवयणभंगो अन्नत्तो य वयभंगो। (समरा पृ. २४७) एका बाजूला गुरुवचनाचा भंग, तर दुसऱ्या बाजूला व्रताचा भंग.