________________
प्रकरण २५) काळ व अर्थ यांचे उपयोग
888888888888888888888888888888888888888888888888888888
४१४ वर्तमानकाळाचे उपयोग
१) वर्तमानकालीन क्रिया दर्शविण्यास वर्तमानकाळाचा उपयोग होतो.
१) एसो सुमिणो सुपुत्र लाभं फुडं कहइ। (सुपास ५३५) हे स्वप्न चांगल्या ज्याचा लाभ स्पष्टपणे दर्शविते २) एयं पि नो वियाण इ। (महा पृ. १४७ अ) हे सुद्धा जाणत नाही.
अ) वर्तमानकालीन चालू (अपूर्ण) क्रिया दर्शविण्यास :
१) संख उरे वच्चामि तित्थाणं दंसणनिमित्तं। (अगड २१०) तीर्थे पहाण्यासाठी मी संखपुरास जात आहे. २) सो एसो आगच्छइ। (सिरि ११९) तो हा येत आहे.
२) सवयीची क्रिया दर्शविताना वर्तमानकाळाचा उपयोग करतात.
१) फरूसं न भणसि। (वज्जा ४०) कठोर बोलत नाहीस २) परवसणंमि सुहेणं संसारानिच्चयं कहइ लोओ। (पाकमा पृ. २६) दुसऱ्याच्या संकटकाली संसाराची अनित्यता लोक सुखाने सांगतात.
३) निसर्गाचे नियम व रचना, सजीव प्राण्यांची वैशिष्टये, सवयी इत्यादि व जे काही नित्य, नियमित एकरूप आहे ते दर्शविण्यास तसेच सामान्य सत्य सांगताना वर्तमानकाळाचा उपयोग केला जातो.
अ) १) संति पंच महब्भूया। (सूय १.१.१७) पांच महाभूते आहेत. २) निसाविरामे दिअहो समेइ दिणावसाणे च उवेइ राई। (पाइ पृ. ७७) रात्र संपल्यावर दिवस येतो, दिवसाचे शेवटी रात्र येते. ३) कालस्सद्ध हरई दिवायरो सव्वरी वि तस्सद्धं। (सुपास ४९१) काळाच अर्धा भाग सूर्य व अर्धा भाग रात्र हरण करतात.
आ) १) सव्वे सत्ता सुहं अहिलसंति न दुक्खं। (समरा पृ. ४०३) सर्व