________________
प्रकरण ३ : स्वरविकार
४१
केव्हा कोणता वर्ण येईल याबद्दल निश्चित नियम सांगता येत नाही. वाङ्मयीन प्रयोगावरून ते ठरवावे लागते.
२३ ह्रस्व ऋ = अ : (ऋतोऽत् । हेम. १.१२६) ।
तृण = तण (गवत), वृषभ = वसभ (बैल), ऋण = अण, दृढ = दढ, घृत = घय (तूप), मृत्यु = मच्चु, मृत्तिका = मट्टिया (माती), तृष्णा = तण्हा, भृति = भइ (वेतन), वृक्ष = वच्छ, मृगांक = मयंक (चंद्र).
(अ) ह्रस्व ऋ असलेल्या काही संस्कृत कर्मणि भूतकाल धातु. विशेषणातील ऋचा अ होतो.
कृत = कय (केलेले), मृत = मय (मेलेला), हृत = हय (हरण केलेले), गृहीत = गहिय (घेतलेले), आहृत = आहड (आणलेले), हृष्ट = हट्ट (आनंदित), सुकृत = सुकय.
२४ ह्रस्व ऋ = इ : (इत्कृपादौ । हेम. १-१२८)
कृपा = किवा, गृह = गिह (घर), वृत्ति = वित्ति (निर्वाह), कृमि = किमि, मृग = मिग (हरिण), समृद्ध = समिद्ध, गृद्धि = गिद्धि (अभिलाष), कृश = किस, दृष्टि = दिट्ठि, शृंग = सिंग (शिंग), वृक = विग (लांडगा), नृप = निव (राजा), ऋषि = इसि, कृपण = किविण, हृदय = हियय.
(अ) समासातील पहिल्या पदाच्या अन्त्य ह्रस्व ऋ चा कधी कधी इ होतो.
मातृ-मरण = माइमरण (आईचे मरण), भ्रातृ-मरण – भाइमरण (भावाचे मरण), मातृ-वध = माइवह (आईचा वध), मातृ-शोक = माइसोय (आईसाठी
शोक).
१. म : कृत्ति – (कत्ति) - कात, तृण - तण, मृदु - मउ, कृष्ण - (कण्ह)
कान्हा, भ्रातृजाया - भावजय. २. म : कृपा - (किवा) - कीव, हृदय - (हियय) -हिय्या, शृंग - शिंग,
दृष्टि - दिठी, मातृ - माइ.