________________
प्रकरण ३) स्वरविकार
888888888888888888888888888888888888888888888888888288
२० स्वरविकारांचे स्वरूप
संस्कृत शब्द अर्धमागधीत येताना त्यातील स्वरात होणाऱ्या विकारांचे दोन मुख्य भाग पडतात : (१) संस्कृत वर्णमालेतील जे स्वर - ऋ, ऋ, लु, ऐ व
औ - अर्धमागधीत नाहीत अशा स्वरात होणारे विकार. (२) हे स्वर सोडून इतर स्वर - जे अर्धमागधीतही आहेत - संस्कृत शब्दात असताना त्यात होणारे विकार.
याखेरीज, स्वरविकारात आणखी एक प्रकारच्या विकारांची दखल घेतली पाहिजे : कधी ह्रस्व स्वर दीर्घ केले जातात, तर कधी दीर्घ स्वर ह्रस्व केले जातात.
अशाप्रकारे स्वरविकारात तीन प्रकारच्या विकारांचा विचार करावयाचा आहे.
२१ ऋ, ऋ, लु, ऐ, औ यांचे विकार
ऋ, ऋ, लु, ऐ व औ हे स्वर अर्धमागधीत नसल्याने ज्या संस्कृत शब्दात हे स्वर आहेत ते शब्द अर्धमागधीत येताना या स्वरात विकार होऊन या स्वरांबद्दल अर्धमागधीत असलेले इतर स्वर वा अक्षरे किंवा स्वर आणि अक्षरे दोन्ही येतात. विशेष म्हणजे एकाच शब्दात एकाच स्वराचे कधी कधी अनेक विकार होतात.
२२ ह्रस्व ऋ चे विकार : (नियमित)
संस्कृतशब्दातील ह्रस्व ऋ चे स्थानी अ, इ, उ किंवा रि हे वर्ण येतात.