________________
प्रकरण २ : वर्णविकार (शब्दसाधनिका) : प्रास्ताविक
१९ वर्णान्तर
अर्धमागधीतील शब्दसाधनिकेचा विचार करताना देशी व तत्सम शब्दांचा विचार करण्याचे प्रयोजन नाही, पण बहुसंख्य तद्भव शब्दांचा विचार करणे हे अत्यावश्यक आहे.
मूळ संस्कृतशब्दातील वर्णात काहीतरी बदल, फरक, परिवर्तन, विकार होऊन तद्भव शब्द सिद्ध होतात. हे विकार एक वा अनेक स्वर किंवा व्यंजने यामध्ये अथवा स्वर आणि व्यंजने या दोहोंतही घडून येऊ शकतात. साहजिकच वर्णविकारात (१) स्वरविकार व (२) व्यंजनविकार असे दोन मुख्य भाग पडतात.
या दोहोंचा आता क्रमश: विचार केला आहे.
तळटीपा १) वर्णविकारांचा विचार हा प्रामुख्याने भाषेच्या शब्दसंग्रहाला धरून असतो.
त्याचा आधार व्युत्पत्ति व त्यायोगे पूर्वस्थितीतून नवस्थितीत येताना ध्वनीत कसकसा बदल, फरक, विकास, विकार झाला हे शोधले जाते. अर्धमागधीतील वर्णविकारांचा विचार म्हणजे पूर्व - संस्कृत - स्थितीतून नव-अर्धमागधी स्थितीत येताना ध्वनि कसे बदलत गेले याचा विचार होय. देश्य प्राकृतबद्दल मार्कंडेय म्हणतो - लक्षणैरसिद्धं तत्तद्देशप्रसिद्धं महाकवि प्रयुक्तं लडह-पेट्ट-तोक्ख आदि । यदाह भोजदेवः - देशे देशे नरेन्द्राणां जनानां च स्वके स्वके ।। भङ्ग्या प्रवर्तते यस्मात्तस्माद्देश्यं निगद्यते ।। मार्कंडेय १.३ पहा. दे.ना.मा. १.३ मध्ये हेमचंद्र म्हणतो : । जे लक्खणे ण सिद्धा ण पसिद्धा सक्कयाहिहाणेसु ।
ण य गउणलक्खणासत्तिसंभवा ते इह णिबद्धा ।।। ३) हे शब्द हेमचंद्रकृत 'देशीनाममाला' वरून घेतले आहेत.