________________
प्रकरण २
वर्णविकार (शब्दसाधनिका) : प्रास्ताविक
BREKERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
१९७
अर्धमागधी शब्दसाधनिका
वाक्यांचे घटक शब्द होत. अर्धमागधीतील शब्दसाधनिकेचा विचार (वर्णविकार'-विचार) म्हणजे संस्कृतमधून अर्धमागधीत शब्द घेतले जात असता त्यात कसेकसे व कोणते विकार होतात याचा विचार करावयाचा. तत्पूर्वी अर्धमागधीतील शब्दसंग्रहाचे स्वरूप काय आहे ते पाहिले पाहिजे.
१८ अर्धमागधी शब्दसंग्रह
:
अर्धमागधीतील शब्द तीन प्रकारात विभागता येतात : (१) देशी शब्द : ज्यांची व्युत्पत्ति वा मूळ संस्कृतमध्ये सापडत नाही, देशी होत. असे शब्द अर्धमागधीत फार थोडे आहेत. काही देशी शब्द असे उडिद (उडीद), कोलित्त (कोलीत), खट्टिक्क (खाटीक), गवत्त ( गवत), गड्डी (गाडी), कोल्हुअ (कोल्हा), टोल (टोळ), डुंगर (डोंगर), पोट्ट (पोट), बाउल्ली (बाहुली), बप्प (बाप), रंजण (घट, रांजण). (२) तत्सम (संस्कृतसम) : पुष्कळ संस्कृत शब्द काही फरक न पावता जसेच्या तसे अर्धमागधीत येऊ शकतात. अशा शब्दांना तत्सम म्हणतात. उदा. कमल, विमल, चित्त, चिंता, देव, देवी, सुर, असुर, नर, पर, जल, इच्छा, फल, मही, राम इ. (३) तद्भव (संस्कृतभव) : अर्धमागधीतील बहुसंख्य शब्द संस्कृत शब्दात विकार होऊन सिद्ध झाले आहेत; त्यांना तद्भव म्हणतात. उदा. केस (केश), दहि (दधि), लहु (लघु), सालि (शालि), वड (वट), लिंब (निंब), भाउ (भ्रातृ), बहिर (बधिर), घड (घट) इ.
देश्य र वा
असे शब्द