________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३८१
३९६ हि
(१) कारण :- साहेसु परपत्थणं मोत्तुण अन्नमुवायं ; पत्थणा हि नाम नरस्स जणेइ मरणसमयनिव्विसे सत्तणं। (महा पृ.१६०अ) पर प्रार्थना सोडून अन्य उपाय सांग, कारण प्रार्थना ही माणसाला मरण समयाप्रमाणे (दुःखदायक) आहे.
(२) नक्की, खात्रीने :- (१) एस मण्णे हि उत्तमे। (उत्त २३.६३) हाच मार्ग उत्तम आहे. (२) अचिंतो हि मणिमंतो सहीण पभावो। (समरा पृ.४१३) मणि, मंत्र, औषधी यांचा प्रभाव खरोखर अचिंत्य आहे.
(३) दृष्टांत, उदाहरण :- न हि जीवंतयस्स भुयगाहिवस्स फणारयणं केणावि घेत्तुं पारिज्जइ। (महा पृ.२१०अ) जिवंत सर्वश्रेष्ठाच्या फणेतील रत्न काढून घेणे जसे कोणालाही शक्य होत नाही.
(४) फक्त या अर्थी जोर देण्यास :- (१) पहुचित्ताणुवत्तणं हि सेवगस्स धम्मो। (महा पृ.८२ब) स्वामीच्या मनाप्रमाणे वागणे हाच सेवकाचा धर्म (२) परजीवरक्खणं हि महापुन्नं वुच्चइ। (महा पृ.२४५अ) परजीवरक्षण यालाच महापुण्य म्हणतात. ३९७ ही, हीही
(१) वितर्क :- ही एसा का लहुया वहुया दीसेइ मज्झ पुत्तिसमा। (सिरि २६८) माझ्या मुलीसारखी ही कोण बरं लहानशी नवरी दिसते आहे!
(२) खेद, विषाद :- (१) ही संसार सहावो सव्वो खणदिट्ठनट्ठो। (सुपास ६४०) अरेरे! सर्व संसार स्वभाव हा क्षणभर दिसून नाहीसा होणारा आहे. (२) ही ही विहविलसियं विसमं। (सिरि २९७) अरेरे! दैवाचा खेळ विषम आहे। ३९८ ह
(१) दान :- हुं गिण्हसु कणयभायणयं। (कुमार ४.१०) हं! सोन्याचे भांडे घे. (२) पृच्छा :- हुं तुह पिओ न आओ। (कुमार ४.११) हू! तुझा प्रियकर आला नाही ?
१ हि पादपूरणे हेतौ विशेषेऽप्यवधारणे। २ हुं दान पृच्छानिवारणे। हेम २.१९७ ; हुं दान पृच्छानिर्धारणेषु।
प्रा.प्र. ९.२, हुं निश्चयवितर्कसम्भावनेषु। प्रा. प्र. ९.६