________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
पृ.४१४) अल्प पुण्यवानांची इच्छा मुळीच पूर्ण होत नाही.
३८५ साहु (साधु)
(१) जणेणं उग्घुट्ठ
चांगले, छान :साहु साहु साहु त्ति। (पउम ३३.१३४) ‘छान ! छान ! छान ! असा लोकांनी घोष केला. (२) साहु वच्छ साहु उचिओ ते विवेगो । (समरा पृ.१९) छान ! छान ! बाळा तुझा विवेक उचित आहे.
३८६ सिया
-
शक्य आहे, कदाचित्, या अर्थी उपयोग केलेला आढळतो.
(१) सिया मणो निस्सरई बहिद्धा । (दस २.४) कदाचित् त्याचे मन बाहेर पडेल. (२) सिया विसं हालहलं न मारे । ( दस ९.१.७) हालाहल विष मारणार नाही हे ही (एकवेळ) शक्य आहे. ३८७ हंजे
मैत्रीण वा दासी यांना संबोधिताना
:
हंजे! किमेयं। (समरा पृ.६२२) अग, काय हे?
३७७
३८८ हंत'
(१) विस्मय :- (१) समुप्पन्नो य मे विम्हओ हंत किमेयं। (समरा पृ.५००) मला विस्मय वाटला - बापरे! काय हे ! (२) हंत कहमणेणाहं वियाणिओ। (धर्मो पृ.१३३) अरेच्चा! याने मला कसे ओळखले ?
:
(२) गोंधळ हंत किमेयं। (समरा पृ.५००) अरे ! काय हे पृ. (३) विषाद, खंद, दुःख :- हंत देव्वविलसियमिणं । (धर्मो प्र.४३) अरेरे! हा दैवाचा खेळ!
(४) हर्ष :- हंत सुणंतु भवंतो । (राय पृ. ५३) छान, अहो तुम्ही ऐका. (५) वाक्यारंभ :- (१) हंता समणोवासगा । ( कथा पृ. ९२) श्रमणो
पासका.
१ हन्त हर्षेऽनुकम्पायां वाक्यारम्भविषादयोः।।
अभ्युपगमे सत्ये वा। (उवा. परि. ११५)
२ मलयगिरि, राय.पृ. ५५