________________
३७६
अर्धमागधी व्याकरण
मुलगी? (२) पुत्ति, कासि तुमं कओ वा समागया किं वा सोयकारणं कहिं वा गंतव्वं। (बंभ पृ.७३) मुली, तू कोण? आणि कोठून आलीस? व शोक करण्याचे कारण काय? आणि कुठे जायचे आहे?
(३) पादपूरण :- जुद्धेहिं अज्जियं जं रजं तं हारियं व जुएण। (नल पृ.१०) युद्धाने जे राज्य मिळविले ते द्यूतात गमावले.
(अ) अहवा, किं वा :- विकल्प दर्शक वाक्ये जोडण्यास ३८२ सक्का
शक्य आहे :- नो खलु सक्का माणुस्सएणं उवाएणं... धारिणीए देवीए अकालडोहलमणोरह संपत्ति करित्तए। (नायास प.१५) धारिणी राणीच्या अकाली (उत्पन्न झालेल्या) डोहाळ्याची मनोरथपूर्ती मानवी उपायांनी करता येणे, हे मुळीच शक्य नाही. ३८३ सक्खं (साक्षात्)
प्रत्यक्ष :- जइ सि सक्खं पुरंदरो। (उत्त. २२.४१) जरी तू साक्षात् इंद्र असलास. ३८४ सव्वहा (सर्वथा)
(१) सर्व प्रकारे :- (१) सव्वहा अणुकूलो। (कथा पृ.१४५) सर्वप्रकारे अनुकूल (२) जं सामिणी भणइ तं सव्वहा करिस्सामि। (कथा पृ.१०९) स्वामिनी जे म्हणेल ते सर्वप्रकारे करीन.
(२) नक्कीच :- (१) सव्वहा धन्ना ह। (महा पृ. १६४ ब) मी नक्कीच धन्य आहे. (२) देवि एवं सव्वहा गब्भाणुभावो। (कथा पृ.१५) राणीसाहेब, हा नक्कीच गर्भाचा प्रभाव!
(अ) सव्वहा न : मुळीच न, अजिबात न :
(१) इह खलु संसारे न सव्वहा सुहमत्थि। (समरा पृ. १७७) या संसारात मुळीच सुख नाही. (२) सव्वहा न अप्पपुण्णाणं समीहियं संपज्जइ। (समरा
१ गोरे, नलकहा, टीपा, पृ. १६ २ वाक्ये जोडणे, परिच्छेद ४३९ पहा.