________________
प्रकरण २२ : अव्ययांचे उपयोग
३७५
३७८ माइ, माई
निषेध, नको :- सप्पं छिव माइ पाएहिं। (सापाला पायाने स्पर्श करु नको) ३७९ रे२
(१) संबोधन :- (१) रे वरगइंम। (वजा १९७) रे गज श्रेष्ठा (२) को रे तुवं। (उत्त. १२.७) कोण रे तू?
(अ) रे रे :- रे रे वरधणू। (बंभ पृ.५५) अरे वरधणू
(२) रतिकलह :- मम हिययं हरिऊणं गओ सि रे किं न जाणिओ तं सि। सच्चं अच्छिनिमीलणमिसेण अंधारयं कुणसि।। (कथा पृ.४८) माझे हृदय हरण करुन तु गेलास हे रे काय माहीत नाही? डोळे झाकण्याच्या मिषाने खरोखर अंधारच (निर्माण) करीत आहेस. ३८० वरं
अधिक बरे :- वरमन्न देसगमणं वरं मरणदुक्खं। (महा पृ.८२ अ) अन्यदेशगमन अधिक बरे; मरण दुःख अधिक बरे.
(अ) वरं - न उण :- हे बरे-पण न :__ वरं एए सुणह पुरिसा न उण अहं पुरिस सुणहो। (समरा पृ.२६८) हे कुत्रे बरे; पण कुत्र्याप्रमाणे असणारा मी मात्र चांगला नाही. ३८१ वा, व (वा)
(१) किंवा या अर्थी विकल्प दाखविण्यास, प्रत्येक शब्द वा विधान यासह किंवा शेवटी एकदा :- (१) हत्था वा पाया वा कण्णा वा अच्छी वा नामा वा। (विवाग. पृ.२) हात वा पाय वा कान वा डोळे वा नाक. (२) किं वच्चामि विदेसं किं वा तायस्स अंतियं जामि। (अगड १४) (मी) परदेशी जाऊं वा वडलांच्या जवळ जाऊ ?
(२) आणि, तसेच, या अर्थी समुच्चय दर्शविण्यास :(१) का एसा कस्स वा धूया। (नल. पृ ४३) ही कोण आणि कुणाची
१ माइं मार्थे । हेम २.१९१ ; मार्क ८.३ २ 'अरे' वरील तळटीप पहा.